नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतलाय. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआयएम, सीपीआय, तृणमूल काँग्रेस यांसह 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.
या डिनरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राजदचे तेजप्रताप यादव, बसपा नेते सतीश चंद्र, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, तारीक अन्वर, द्रमुकच्या कनिमोळी, राष्ट्रीय लोकदलाचे अजित सिंह, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, शरद यादव, आययूएमएलचे पी. के. कुन्हालीकुट्टी, एआययूडीएफचे बद्रुद्दीन अजमल, केरळ काँग्रेसचे जोस के. मणी, जनता दल सेक्युलरचे डी. कुपेंद्र रेड्डी आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांची उपस्थिती होती.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला हे नेतेही डिनरला हजर होते.
या डिनरचं आयोजन राजकारणासाठी केलेलं नव्हतं, असं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं. मात्र सरकारची संसद चालवण्याची इच्छाशक्ती नाही. त्यामुळे आपापल्या भागातील प्रश्नांविषयी चिंतेत असणाऱ्या नेत्यांची देशातील राजकाराणाविषयी चर्चा तर होईलच, असंही सुरजेवाला म्हणाले.
सोनियांची डिनर डिप्लोमसी, दिल्लीत मोदी विरोधक एकवटले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Mar 2018 11:35 PM (IST)
यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआयएम, सीपीआय, तृणमूल काँग्रेस यांसह 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -