यापुढे LoU आणि LoCs जारी करण्यास बँकांना बंदी!
एबीपी माझा वेब टीम | 13 Mar 2018 11:11 PM (IST)
यापुढे 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' (LoU) आणि 'लेटर ऑफ कम्फर्ट' (LoCs) जारी करण्यास तातडीने बंद घातली आहे.
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील 13 हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने कठोर पाऊल उचललं आहे. यापुढे 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' (LoU) आणि 'लेटर ऑफ कम्फर्ट' (LoCs) जारी करण्यास तातडीने बंद घातली आहे. एलओयू म्हणजे 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'. हे एकप्रकारे हमीपत्र असतं. हे पत्र एक बँक दुसऱ्या बँकेच्या शाखांना जारी करते. हमीपत्राच्या आधारे बँकेच्या परदेशी शाखा कर्जदारांना कर्ज किंवा क्रेडिट दिलं जातं. बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि लेटर ऑफ कम्फर्टच्या आधारे नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी या दोघांनी कर्ज मिळवलं. हे दोघेही कर्जाची रक्कम बुडवून देशाबाहेर पसार झाले आहेत. त्यामुळे आरबीआयने आता एलओयू आणि एलसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात केल्या जाणाऱ्या आयातीसाठी ट्रेड क्रेडिट, लेटर ऑफ क्रेडिट आणि बँक गॅरंटी सध्या अस्तित्वात असलेल्या तरतुदींनुसार दिली जाऊ शकते, असंही आरबीआयने स्पष्ट केलं. संबंधित बातमी :