19th July In History: इतिहासात 19 जुलै हा दिवस देशाच्या बँकिंग इतिहासात महत्त्वाचा मानला जातो. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते. या बँका बहुतांशी मोठ्या औद्योगिक घराण्यांच्या मालकीच्या होत्या. राष्ट्रीयीकरणाची दुसरी फेरी 1980 मध्ये आली, त्या अंतर्गत आणखी सात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 19 जुलै या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांची मालिका पुढीलप्रमाणे आहे,
1827: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रदूत मंगल पांडे यांचा जन्म
1857 च्या स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पेटवणाऱ्या मंगल पांडेचा (Mangal Pandey) जन्म 19 जुलै 1827 रोजी झाला. मंगल पांडे हा बंगालच्या बराकपूर सैन्यदलामधील 34 व्या रेजिमेंटचा सैनिक. ब्रिटिशांच्या नव्या काडतुसांना गाईचे आणि डुक्कराची चरबी लावलेली आहे अशी माहिती सैनिकांत पसरली आणि एकच खळबळ उडाली. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे. अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची आणि डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले. इतकेच नव्हे तर त्याच्या विरोधात बंड केला. याचे नेतृत्व मंगल पांडे याने केले.
मंगल पांडेच्या या कृत्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि 8 एप्रिल 1857 रोजी त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर या क्रांतीची ठिणगी पेटली आणि ती देशभर पसरली.
1848: सिनिका फॉल्स, न्यूयॉर्क येथे प्रथम महिला हक्क अधिवेशन आयोजित केले गेले.
1870: फ्रान्सने पर्शियाविरुद्ध युद्ध घोषित केले.
1900: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पहिली मेट्रो रेल्वे धावली. यापूर्वी लंडनमध्ये जगातील पहिली मेट्रो सेवा सुरू झाली होती.
1938 : खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांचा जन्म
भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर (Jayant Narlikar) यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापुरात झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांच्या आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. 1957 साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए आणि पीएचडीच्या पदव्या मिळवल्या. शिवाय रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार आणि इतर अनेक बक्षिसे मिळाली. जयंत नारळीकर यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. 1988 साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
जयंत नारळीकर यांनी मराठी भाषेतून विज्ञानाचे साहित्य लेखन केलं. अवकाश विज्ञानातील त्यांचे योगदान लक्षात घेता 2004 साली त्यांना पद्मविभूषन पुरस्कार देण्यात आला. 2010 साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसेच 2021 सालच्या नाशिक येथील आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
1940: अॅडॉल्फ हिटलरने ब्रिटनला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले.
1969: अपोलो II अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन वाहनातून बाहेर पडले आणि चंद्राच्या कक्षेत गेले.
1969: इंदिरा गांधींनी 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण केलं
देशाच्या इतिहासात महत्त्वाची अशी घटना 19 जुलै रोजी घडली. 19 जुलै 1969 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी 14 खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण (Nationalisation of banks in India) केले होते. या बँका बहुतांशी मोठ्या औद्योगिक घराण्यांच्या मालकीच्या होत्या. सर्वसामान्यांना कर्जाचे वितरण व्हावे, त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी या हेतून इंदिरा गांधी यांनी हा निर्णय घेतला.
2001: नेपाळचे पंतप्रधान गिरिजा प्रसाद कोईराला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
2003: रशियन अंतराळवीर युरी माले थँको अंतराळात लग्न करणारी पहिली व्यक्ती ठरली.
2004: तीन वेळा पुढे ढकलल्यानंतर, एरियन-5 ने फ्रेंच गयाना येथील कौरो प्रक्षेपण केंद्रातून जगातील सर्वात मोठा दूरसंचार उपग्रह घेऊन उड्डाण केले.
2005: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले.
2008: अमेरिकेने पॅसिफिक महासागरातील लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम असलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली.
2021: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 31 जणांचा मृत्यू झाला.
2021: लॉकडाऊन, अनिवार्य मास्किंग आणि कोविड संबंधित निर्बंध इंग्लंडमध्ये एका वर्षानंतर उठवण्यात आले.