'टाईम्स ऑफ इंडिया'ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दरवर्षी तब्बल 350 जवानांचा मृत्यू रस्ते अपघातात होतो. तर 120 जवान हे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. ट्रेनिंगदरम्यान होणारे मृत्यू, आरोग्याचे प्रश्न हेसुद्धा जवानांच्या मृत्यूमागील गंभीर कारणं ठरत आहेत.
जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात, असंही ही आकडेवारी सांगते. आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाणही आपल्या देशात सर्वाधिक आहे. देशाला शिस्तीचं महत्त्व सांगणारे जवानही अशा गोष्टींना बळी पडत असतील, तर ही चिंतेची बाब आहे.