नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वाजपेयींनी तीन वेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं. जिंदादिल राजकारणी, हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना ‘राईट मॅन इन राँग पार्टी’ असं म्हटलं गेलं.
अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी :
1. अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्या वडिलांनी एकत्र कायदे विषयांच शिक्षण घेतलं
2. अटल बिहारी वाजपेयी वडिलांसोबत एकाच हॉस्टेलमध्ये राहत होते
3. रा. स्व. संघामध्ये सहभागी होण्यापूर्वी त्यांनी कम्युनिस्ट म्हणून सुरुवात केली.
4. 1942 मधील ऑगस्ट क्रांतीच्या वेळी वाजपेयी बालसुधारगृहात गेले होते.
5. संघाचं मुखपत्र चालवण्यासाठी त्यांनी कायद्याच्या शिक्षणाला रामराम
6. पेट्रोलच्या वाढत्या किमतींचा विरोध करण्यासाठी वाजपेयी बैलगाडीने संसदेत गेले होते
7. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत काश्मिरमध्ये आमरण उपोषणाला बसले होते
8. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीमध्ये भाषण करणारे वाजपेयी हे पहिलेच भारतीय होते
9. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होतील, असं भाकित जवाहरलाल नेहरु यांनी वर्तवलं होतं.
10. मनमोहन सिंह यांनी अटलजींचा 'भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह' या शब्दात गौरव केला
11. राजकीय कारकीर्दीत वाजपेयी केवळ एकदाच निवडणुकीत पराभूत झाले होते
12. पंतप्रधानपदाची 5 वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे वाजपेयी हे पहिले काँग्रेसेतर पक्षाचे पंतप्रधान आहेत.
13. संपूर्ण राजकीय कारकीर्दीत 10 वेळा लोकसभेत आणि दोन वेळा राज्यसभेत खासदार म्हणून निवडून गेले.
14. चार मतदारसंघांमधून लोकसभा खासदार झालेले ते एकमेव राजकीय नेते आहेत.
बलरामपूर (उत्तर प्रदेश)
दुसरी लोकसभा (1957-62) - भाजप
चौथी लोकसभा (1967-71) - भाजप
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)
पाचवी लोकसभा (1971-77) - भाजप
नवी दिल्ली
सहावी लोकसभा (1977-80) - जनता पक्ष
सातवी लोकसभा (1980-84) - भाजप
लखनौ (उत्तर प्रदेश)
दहावी लोकसभा (1991-96) - भाजप
अकरावी लोकसभा (1996-98) - भाजप
बारावी लोकसभा (1998-99) - भाजप
तेरावी लोकसभा (1999-2004) - भाजप
चौदावी लोकसभा (2004-09) - भाजप
15. अटल बिहारी वाजपेयी यांचा 1992 मध्ये पद्म विभूषण, तर 2015 मध्ये भारतरत्नने सन्मानित
अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Aug 2018 05:58 PM (IST)
वाजपेयींनी तीन वेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं. जिंदादिल राजकारणी, हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना ‘राईट मॅन इन राँग पार्टी’ असं म्हटलं गेलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -