हैदराबादः तेलंगना राज्याच्या दलित भागात राहणाऱ्या मुली वयाच्या 13 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करुन इतिहास रचला आहे. ही मुलगी एवढ्या कमी वयात हिमशिखर सर करणारी जगातील पहिलीच व्यक्ति ठरली आहे.


 

 

मालवथ पूर्णा असं या हिमकन्येचं नाव अस ती तेलंगनामधील निझामाबाद जिल्ह्यातील आहे. पूर्णाचा जन्म 10 जून 2000 साली झाला आहे. ती सध्या 9 वीच्या वर्गात शिकते.

 

असा झाला पूर्णाचा प्रवास

पूर्णाच्या बाबतीत सर्वात विशेष गोष्ट म्हणजे तिने यापूर्वी कसलंही शिखर चढलेलं नाही. पूर्णाने 10 नेपाळच्या गाईडसोबत चढाईला सुरुवात केली. चढाई करण्यासाठी सप्टेंबर 2015 मध्ये प्रशिक्षण घेतलं, असं पूर्णाने सांगितलं.

 

 

पूर्णाला या चढाईमध्ये शासनाची मोठ्या प्रमाणात मदत मिळाली.  पूर्णाने जवळपास 7 महिने चढाई करण्याचं प्रशिक्षण घेतलं. ही पूर्ण चढाई करण्यासाठी पूर्णाला 52 दिवस लागले. या काळात रस्त्यात पूर्णाने 6 गिर्यारोहकांचे मृतदेह पाहिले, असं पूर्णाने सांगितलं.

 

 

आदिवासी समाजासाठी प्रेरणा

पूर्णाच्या अगोदर 2010 साली अमेरिकेच्या जॉर्डन रोमेरो या सर्वात कमी वयाच्या मुलाने एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला होता. मात्र त्याच्या वयावरुन अनेक तर्क वितर्क लावण्यात आले होते. पूर्णाला ही चढाई करण्याची संधी मिळाल्याबद्दल ती खूष आहे. आदीवासी समाजातील लोक सुद्धा काहीही करु शकतात, हे सिद्ध करायचं आहे. तसंच अजून अनेक शिखरं पार करायचे आहेत. शिवाय पोलिस अधिकारी बनायचं आहे, असं पूर्णा सांगते.