गुवाहाटी : आसामच्या कोकराझारमधील गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. बोडो अतिरेक्यांनी हा हल्ला केल्याचा संशय आहे.


 

कोकराझारपासून 40 किमी अंतरावर असलेल्या बालाझारच्या बाजारात ही घटना घडली. 5 ते 7 अतिरेकी रिक्षाने बाजारात आले आणि अंधाधुंद गोळीबार केला.

 

हल्ल्यात 13 नागरिकांचा मृत्यू झाला, तर एका अतिरेक्यालाही कंठस्नान घालण्यात आलं आहे. 15 जखमींपैकी ज्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना उपचारांसाठी गुवाहाटीमध्ये पाठवलं आहे.

 

अतिरेकी आणि सुरक्षरक्षांमध्ये चकमक अजूनही सुरु आहे. जवानांनी नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्डच्या एका अतिरेक्याला ठार केलं.

 

या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवालने परिस्थितीची माहिती त्यांना दिली. यानंतर मोदींनीही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख आणि जखमींना एक लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.