वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 29 Jan 2019 12:05 PM (IST)
मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील कुटुंब लग्नाहून परतत असताना त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

भोपाळ : मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील कुटुंब लग्नाहून परतत असताना त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. उज्जैनजवळच्या भैरवगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाला आहे. अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री एकच्या सुमारास वेगाने येणाऱ्या कारची धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणाची पोलीस कार्यवाही सुरु आहे.