नवी दिल्ली: सोन्याला असलेल्या कमी मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. गेले अनेक दिवस सोनं तीस हजारांचा पार होतं. मात्र, काल सोन्याच्या किंमतीत 150 रुपयांची घट झाली असून काल सोन्याचा भाव 29,650 रु. प्रति तोळा होता.
सोन्याबरोबरच चांदीच्याही किंमतीत 160 रुपयाची घट झाली होती. त्यामुळे चांदीची किंमत 41,200 रु. प्रति किलो आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत झालेली घट आणि भारतात सोन्याची कमी मागणी असल्यानं ही घट झाली होती.