Cheetahs Arrive in India from Africa : दक्षिण आफ्रिकेतून भारतात 12 चित्ते पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) शुक्रवारी रवाना झालेले चित्तेत आज (18 फेब्रुवारी) मध्य प्रदेशातील ग्वालियर विमानतळावर दाखल झाले आहेत. तेथून त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले आहेत. भारतीय हवाई दलाच्या C17 विमानामधून 12 चित्ते भारतात पोहोचले. हे विमान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला पोहोचलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात भारत सरकारकडून 'प्रोजेक्ट चित्ता' (Project Cheetah) मिशन राबवलं जात आहे. या अंतर्गत भारतातून नामशेष झालेले चित्ते भारतात आणण्याचं काम सुरु आहे. यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसादिवशी तब्बल 70 वर्षानंतर भारतात चित्ते परतले आहेत. 


दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात पोहोचले


आता पुन्हा एकदा 12 चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. या 12 चित्त्यांपैकी सात नर आणि पाच मादी आहेत. या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहे. हवाई दलाचं विमान चित्त्यांना घेऊन सकाळी 10 वाजता भारतात मध्य प्रदेशातील ग्वालियर विमानतळावर उतरलं. त्यानंतर चित्यांना हेलिकॉप्टरद्वारे कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलं आहे. आता मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते चित्ते सोडण्यात आले.  


पाहा व्हिडीओ : 






कुनो नॅशनल पार्कमध्ये एकूण 20 चित्ते


याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते चित्ते कुनो पार्कमध्ये सोडण्यात आले होते. त्यानंतर आज आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते भारतात दाखल झाले आहेत. यामुळे आता कुनो नॅशनल पार्कमध्ये एकूण 20 चित्ते आहेत.


आफ्रिकेतून आलेल्या चित्त्यांना क्वारंटाईन करणार


दक्षिण आफ्रिकेतील गौतेंग येथील ओआर टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हे 12 चित्ते शुक्रवारी संध्याकाळी भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानातून रवाना करण्यात आले. हे विमान शनिवारी सकाळी ग्वाल्हेर विमानतळावर उतरलं. त्यानंतर चित्यांना हेलिकॉप्टरने 165 किमी दूर असलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या हस्ते चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात क्वारंटाईन करण्याच्या जागी सोडण्यात आलं आहे. यावेळी मीडियाला पार्कमध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही. याआधी आठ चित्त्यांना पार्कमध्ये सोडलं त्यावेळी पंतप्रधान उपस्थित होते आणि मीडियाला प्रवेश देण्यात आला होता.


70 वर्षांपूर्व भारतातून चित्ता नामशेष 


भारतातून तब्बल 70 वर्षांपूर्वी 1952 मध्ये चित्ता नामशेष झाला. भारतातून नामशेष झालेले चित्ते भारतात आणण्याची तयारी काँग्रेस सरकारच्या काळात सुरु झाली होती. छत्तीसगढमध्ये शेवटच्या चित्याची शिकार झाली होती. 1970 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इराणहून भारतात चित्ते आणण्याची तयारी सुरु केली होती. आमचे काही वाघ तुम्हाला घ्या, त्या बदल्यात चित्ते आम्हाला द्या अशी ती ऑफर होती. इराणच्या शाहांशी इंदिरा गांधी यांनी करारावर सह्याही केल्या होत्या. पण इराणमध्ये सत्ताबदल झाला, शाहांची राजवट गेली. नंतर हा प्रकल्प बारगळला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Project Cheetah : भारतात 70 वर्षांनंतर परतले चित्ते, नामिबियातून 8 चित्ते भारतात दाखल