खळबळजनक घटनेने दिल्ली हादरली, एकाच घरात 11 मृतदेह
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2018 09:34 AM (IST)
बुराडी भागातील एकाच घरात 11 मृतदेह सापडल्याची घटना दिल्लीत घडली. मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सकाळच एका खळबळजनक घटनेने झाली आहे. बुराडी भागातील एकाच घरात 11 मृतदेह सापडल्याची घटना दिल्लीत घडली. मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. मृतांमधील सर्व एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. सर्वांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र अजून कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलीस घटनेचा कसून तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सर्व मृतदेह घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबातील सर्व व्यक्ती दूध आणि फर्निचर व्यवसायाशी संबंधित आहेत. पोलिसांना सकाळी साडे सात वाजता घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर मृतदेह शिवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील व्यक्तींचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.