Omicron नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीने चिंताग्रस्त आहे. त्यातच आता ओमायक्रॉनच्या व्हेरियंटने आणखीनच चिंतेत भर टाकली आहे. केवळ एका आठवड्याच्या आत जगभरातील 40 देशांमध्ये हा ओमायक्रॉन पसरला आहे. भारतातही (India)आतापर्यंत ओमायक्रॉनचे (Omicron)तीन रूग्ण सापडले आहेत. यातील कर्नाटकातील दोन आणि गुजरातमधील एका रूग्णाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरूनच ओमायक्रॉनबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच देशांनी सतर्कता बाळगण्यास सुरूवात केली आहे. परंतु, भारतात मात्र, लोक याबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. कारण, भारतात घराबाहेर पडताना तीन लोकांमागे केवळ एकच नागरिक मास्कचा (Mask )वापर करत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वेक्षण केलेल्या केवळ दोनच टक्के लोकांनी सांगितले की, आमच्या परिसरातील लोक मास्कच्या नियमाचे पालन करत आहेत. आरोग्याच्या दृष्टीकोनातून ही बाब अत्यंत गंभीर आहे. 


सोशल मीडियाच्या आधारे 'लोकल सर्कल' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या संस्थेने एप्रिल (April)महिन्यात पहिला सर्वे केला होता. त्याला देशभरातील 364 जिल्ह्यांमधील 25 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी (citizens)प्रतिसाद दिला होता. त्यामध्ये 29 टक्के लोकांनी मास्कचे पालन करत असल्याचे म्हटले होते. सप्टेंबरमध्ये (September,)ही टक्केवारी 12 टक्क्यांवर घसरली आणि नोव्हेंबरमध्ये (November)करण्यात आलेल्या सर्वेतून ती 2 टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याचे समोर आले आहे.  


कोरोनाचा (CORON) धोका कायम असतानाही मास्कचा वापर करण्याच्या प्रमाणात होत असलेल्या टक्केवारीची घसरण पाहता लोकांना अजूनही मास्कच्या वापराबाबत जागृत करणे काळाजी गरज आहे.  


ओमायक्रॉनचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घातले पाहिजेत. शिवाय मास्क घालण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे.  


एका कुटुंबातील दोन व्यक्तींनी मास्क घातला नसेल तर केवळ दहा मिनिटांत संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला विषाणूची बाधा होते. या उलट जर या दोन्ही व्यक्तींनी एन-95 मास्कचा वापर केला तर पुढील सहाशे तास बाधित व्यक्तीपासून कोणालाही धोका होत नाही.  


दरम्यान, जगभरातील शास्त्रज्ञांनी ओमायक्रॉनच्या प्रसाराबाबत धोक्याची घंटा दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या 


Omicron in Gujarat : कर्नाटकापाठोपाठ गुजरातमध्येही ओमायक्रॉनचा शिरकाव, झिम्बाब्वेमधून आलेल्या नागरिकाला लागण


Omicron : कोरोनाची तिसरी लाट कदाचित ओमायक्रॉनच्या रुपात, मात्र घाबरण्याचं कारण नाही: राजेश टोपे