India Pakistan Drone Attack News : पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या अयशस्वी प्रयत्नांना भारताने योग्य उत्तर दिले आहे. यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या लोहार आणि सियालकोटवर  (India Drone Attack On Lahor) ड्रोन हल्ला केला आहे. भारताच्या प्रत्युत्तर हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. लाहोर, इस्लामाबाद, कराची आणि बहावलपूरमध्ये सायरन वाजत आहेत. भारताने लाहोरमधील AWACS हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली आहे. इस्लामाबादमध्येही भारताने मोठी कारवाई केली आहे. परिणामी संपूर्ण इस्लामाबादमध्ये सायरनचा मोठा आवाज होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement


भारताचा थेट इस्लामाबादवर हवाई हल्ला, पाकिस्तानचे धाबे दणाणले


यापूर्वी, पाकिस्तानने जम्मू, राजस्थान आणि पंजाबमधील अनेक भागात ड्रोन हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, ज्याला भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने योग्य उत्तर दिले. भारताने त्यांच्या काउंटर ड्रोन सिस्टीम, S-400 वापरून पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्रे पाडली. एवढेच नाही तर भारताने पाकिस्तानची अनेक लढाऊ विमाने पाडली आहेत. भारताने पाकिस्तानचे 2 जेएफ 17 आणि एक एफ-16 विमान पाडले आहे.


पाकिस्तानी लढाऊ विमान भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न


हे पाकिस्तानी लढाऊ विमान भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते, जे भारताने पाडले आहेत. सध्या जम्मूमध्ये वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. त्याच वेळी, राजस्थान, पंजाब तसेच जम्मू आणि काश्मीरमधील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्युत्तर कारवाईदरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सीडीएस आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांशी सतत संपर्कात आहेत. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.


अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांची एस जयशंकर यांच्याशी चर्चा


दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, "मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्याशी चर्चा केली.त्यांनी तणाव त्वरित कमी करण्यावर भर दिला." सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान भागात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे.


पाकिस्तानची संरक्षण यंत्रणा नष्ट झाली.


भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानची सर्वात अद्ययावत एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) नष्ट झाली आहे. ही संरक्षण प्रणाली पाकिस्तानच्या देखरेख आणि युद्ध नियंत्रण क्षमतेचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते.


आणखी वाचा


पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, धर्मशालात ब्लॅकआऊट, दिल्ली विरुद्ध पंजाबची मॅच अर्ध्यातच थांबवली