मुंबई : महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्वे करण्याता आला आहे. जनसामान्यांना विविध मुद्द्यांवर, सरकारच्या कामगिरीवर काय वाटतं याचा उलगडा या सर्वेतून झाला आहे. द स्ट्रेलेमा संस्थेने हा सर्वे केला. 11 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व विभागाचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. 10 हजार लोकांशी बातचित करुन काही निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचले असल्याचं स्ट्रेलेमा संस्थेचे अध्यक्ष सुशील शिंदे यांनी सांगितलं.


ठाकरे सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात अनेक मुद्दे चर्चेत राहिले. यावर राज्यातील 21 जिल्ह्यांत हे सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये शिक्षण, वय, व्यवसाय अशा विविध निकषांचा यामध्ये विचार करण्यात आला आहे.


कोरोनाचा प्रश्न सरकारने योग्य पद्धतीने हाताळला असं तुम्हाला वाटतं का?
हो - 59
नाही 19
सांगता येत नाही - 22


कोरोनामुळे निर्माण झालेले शिक्षणाचे प्रश्न सरकारने योग्य पद्धतीने हाताळले का?
हो- 53 टक्के
नाही -27 टक्के
सांगता येत नाही - 20 टक्के


आपल्या मते मंदिरं उघडण्यास उशीर झाला का?
हो - 36 टक्के
नाही- 43 टक्के
सांगता येत नाही- 21 टक्के


कोरोना काळात सरकारने शेतीविषयक प्रश्न योग्य पद्धतीने हाताळले का?
हो - 48 टक्के
नाही- 25 टक्के
सांगता येत नाही- 27 टक्के


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडत नाहीत अशी टीका होतेय, त्यांनी कोरोना काळात बाहेर पडायला हवं होतं का?
हो - 35 टक्के
नाही - 38 टक्के
सांगता येत नाही- 27 टक्के


आपल्या मते मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार योग्य पद्धतीने हाताळत आहे का?
हो- 37 टक्के
नाही - 29 टक्के
सांगता येत नाही - 34 टक्के


आरे कारशेड हलवण्याचा निर्णय योग्य आहे, असं आपल्याला वाटतं का?
हो - 36 टक्के
नाही - 23 टक्के
सांगता येत नाही -41 टक्के