Nashik Accident News : नाशिकमधील रस्त्यांच्या दुरावस्थांचे भीषण वास्तव दाखवणारी बातमी समोर आली आहे. यात शहरातील एका खड्ड्यात दुचाकी आदळून सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री नाशिकच्या अमृतधाम रोडवर दिनकर झेटे यांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होत. या अपघातात झेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने काल मध्यरात्री उपचारादरम्यान दिनकर झेटेचा मृत्यू झाला आहे.

Continues below advertisement


दरम्यान, प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी असल्याने संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता झेटे कुटुंबाने केली आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


सुप्रिया सुळेंकडून प्रशासनाला विनंती


नाशिक ते त्र्यंबकेश्वर या राज्य मार्गाची अतिशय वाईट अवस्था आहे. जागोजागी खड्डे पडले असून या रस्त्यावरुन प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मार्गावरुन भाविकांची ये-जा असते. सध्या रस्त्याची अवस्था पाहता हा रस्ता वाहतूकीच्या दृष्टीने सुरक्षित आणि सोयीचा देखील राहिलेला नाही. माझी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा.






नाशिक–संभाजीनगर महामार्गावर अंदरसुलजवळ कंटेनर उलटला


नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसुल परिसरात नाशिक–संभाजीनगर महामार्गावर आज सकाळी एक कंटेनर उलटल्याची घटना घडली आहे. हा कंटेनर सोलर प्लेट घेऊन जात होता. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कंटेनरमधील सोलर प्लेटचे मोठे नुकसान झाले आहे. कंटेनर उलटल्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, गवंडगाव टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. याशिवाय शिर्डी–अहिल्यानगर महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक संभाजीनगर महामार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे..


ही बातमी वाचा: