Chandra Grahan on Holi 2024 : यंदा वर्षातील पहिलं चंद्रग्रहण (Chandra Grahan) हे होळीच्या दिवशी, म्हणजेच 25 मार्च रोजी होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसत नसलं तरी याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होईल. दुसरीकडे, राहू आणि सूर्य देखील समस्या निर्माण करू शकतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या राहू मीन राशीत आहे. योसोबतच सूर्यही मीन राशीत असेल. अशा स्थितीत सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे होळीच्या (Holi 2024) दिवशी ‘ग्रहण योग’ तयार होत आहे.


यासोबतच 24 मार्चला दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात चंद्र केतूसोबत कन्या राशीत असेल. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे बालरिष्ट दोष तयार होत आहे. होळीला ग्रहांच्या या स्थितीमुळे काही राशीच्या लोकांना फायदा होईल, तर काही राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे. कोणत्या राशींसाठी ग्रहण दोष हानीकारक ठरेल? जाणून घ्या


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण आणि यासोबतच बनत असलेले ग्रहण दोष आणि बालरिष्ट दोष अनुकूल ठरणार नाहीत. या राशीच्या लोकांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. होळीच्या काळात तुमचं आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागतील. यासोबतच तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही जास्त फायदा होणार नाही. नोकरीत तुम्हाला दबावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला सहकारी त्रास देतील, यावेळी तुम्हाला नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


कुंभ रास (Aquarius)


या राशीच्या लोकांसाठीही होळीचा दिवस फारसा चांगला राहणार नाही. या राशीच्या लोकांना काही ना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जीवनात अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून तुमचे मतभेद होऊ शकतात. करिअरमध्येही तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वरिष्ठांकडून सहकार्य मिळणार नाही. तुम्हाला छोट्या छोट्या कामातही जास्त मेहनत करावी लागू शकते, या सर्व कारणांमुळे तुम्ही अचानक नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यवसायातही करा किंवा मराची परिस्थिती निर्माण होऊ शकते, धनहानी होऊ शकते, त्यामुळे कोणताही निर्णय थोडा विचार करूनच घ्या.


मीन रास (Pisces)


होळीचा दिवशी मीन राशीच्या लोकांच्या जीवनात खूप अडचणी निर्माण होऊ शकतात. या राशीच्या सातव्या घरात केतू आणि चंद्राच्या संयोगामुळे बालरिष्ट दोष तयार होत आहे, त्यामुळे या काळात या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. होळीच्या दिवशी विशेषत: मुलांबाबत थोडं सावध राहाल. मीन राशीच्या चढत्या घरात ग्रहण दोष निर्माण होत आहे, त्यामुळे या काळात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्ही नोकरी बदलण्याचाही विचार करू शकतात. तुम्ही तुमच्या कामात असमाधानी असाल. व्यवसायाच्या क्षेत्रातही थोडं सावध राहण्याची गरज आहे, सावध न राहिल्यास नुकसान होऊ शकतं. तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Dev : शनि उदयानंतर 'या' 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू; कमावणार बक्कळ पैसा, बँक बॅलन्स वाढणार