Santosh Bangar News : कायमच कोणत्या-कोणत्या वादामुळे चर्चेत असणारे कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केलेल्या मारहाणीचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली (Hingoli) शहरालगत असल्यास शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य (Principal) अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केली आहे. आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे.
संजय बांगर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न, अद्याप प्रतिसाद नाही
आमदार बांगर यांनी संबंधित प्राचार्याला का मारहाण केली याचे कारण जरी अस्पष्ट असले तरीही अशा पद्धतीने मारहाण करणे चुकीचेच आहे. आमदार कायदेमंडळात बसून कायदे तयार करतात आणि हेच आमदार बाहेर कसे पायदळी तुडवतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. या विषयावर आमदार बांगर यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
राजकीय पुढाऱ्यांना बंदी असतानाही आमदार बांगर यात्रेत पोहोचले; गावकऱ्यांनी अडवला ताफा
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 8 जानेवारी रोजी हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई इथल्या मसाई मातेची यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांना बोलावलं जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा पाहता जिल्ह्यातील राजकीय पुढारी देखील या यात्रेला जाण्यासाठी टाळतात. मात्र असे असताना देखील आमदार बांगर या यात्रेत गेल्याने गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला होता.
पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप
संजय बांगर वादांमुळे कायमच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी संतोष बांगर यांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती. 27 ऑक्टोबर रोजी आमदार संतोष बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरुन मंत्रालयात जात होते. त्यांच्यासोबत 15 कार्यकर्ते देखील होते. मात्र याचवेळी गेटवर ड्युटीला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पासबाबत विचारपूस केल्याने आमदार बांगर यांनी त्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती. या कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेची नोंद पोलीस डायरीत केली होती. त्यानंतर याबाबत 'एबीपी माझा'ने आज सकाळी बातमी दाखवली होती. त्यामुळे अखेर या घटनेचा अहवाल अप्पर मुख्य सचिव गृह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता.
आमदार बांगर आणि वाद!
- 26 जून 2022 शिवसेनेतील बंडांनंतर वादग्रस्त वक्तव्य
- शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांची मुलं अविवाहित मरतील असं वक्तव्य
- 17 जुलै 2022 रोजी गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा, असं वक्तव्य
- 15 ऑगस्ट 2022 रोजी माध्यान्ह भोजन योजनेत जेवण पुरवणाऱ्या गोडाऊन व्यवस्थापकाला मारहाण
- 14 ऑक्टोबर 2022 रोजी विमान कंपनी कार्यालयात तोडफोड, कृषी अधिकाऱ्याला धमकावलं.
- 27 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप
- आता प्राचार्याला कार्यकर्त्यांसह मारहाण
संबंधित न्यूज