Sudhir Mungantiwar : राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिंगोलीतील हुतात्मा चौकातील स्तंभासमोर पुष्पहार अर्पित करून मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतातम्यांना मानवंदना अर्पित केली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला, यावेळी मराठवाडा मुक्तीसंग्रामात ज्यांनी लढा दिला, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याबद्द माहिती व्हावी याकरिता प्रदर्शन भरवण्यात आलं होत. या प्रदर्शनाचं उदघाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडलं.


यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांनशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिंदे सरकार मराठवाड्यासाठी काय देणार यावर विचारलं. यावेळी ते म्हणाले की,  आमचा विभाग योजना आखेल, आणि सरकारकडून अमृतमोहोत्सवाचा निधी आणि मराठवाड्यासाठी वेगवेगळ्या योजना दिल्या जाणार आहेत. मात्र मागच्या सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात पहिली घोषणा 6 मार्च 2020 रोजी केली. त्यानंतर 8 मार्च 21 रोजी अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांना निधी देऊ घोषणा केल्या. मात्र दिला नाही. 
आत्ताच्या सरकारनं त्या सर्व नकारात्मक गोष्टींना सकारात्मक दृष्टीकोनातून बदलवलं. मला आश्चर्य वाटते काही नेते सत्तेतून दूर झाले त्यांना आज या गोष्टीची आठवण का येते? त्यांना हे निर्णय अडीच वर्षात करता आले असते. त्यांनी काय निर्णय केले तीनशे टक्के दारुवरील कर दीडशे टक्के केला. हा तुमचा महत्वकांक्षी निर्णय आहे का..? जिथे किराणा दुकान एक हजार स्केअर फुटाचं आहे. तिथे वाईन विकणे, पीओ वाईन जिओ फाईन हे तुमचे निर्णय होते. तुमचे निर्णय बेरोजगारांसाठी का नव्हते? का नोकर भर्ती केली नाही. आम्ही ओरडून सांगत होतो तुम्ही नोकर भर्तीसाठी ज्या पाच संस्था नेमल्या त्या ब्लॅकलिस्टेड, तड्डीपार आहेत. हरियाणाने तड्डीपार केल्या आहेत. पण या संस्थांनावर यांचं सख्या भावापेक्षा जास्त प्रेम होतं. अशा लोकांच्या तावडीतून एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी हे सरकार जनतेच्या सेवेत रुजू केलंय. आणि त्या त्यानंतर आडीच वर्ष आणि स्वातंत्र्यानंतर देशातील प्रश्नांना काँग्रेसनें जन्म घातला ते हळू हळू सुटतील.


अशोक चव्हाण यांच्या मुद्द्यावर विचारले  असता  त्या प्रश्नाला बगल देत थेट गांधी आणि पवार घराण्यावर मुनगंटीवार यांनी घराणेशाहीचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, आम्ही देशाचे भाग्य घडवण्यासाठी राजकारण करतोय आणि अनेक राजकीय पक्ष त्यांच्या मुलांचे राजकीय भविष्य घडवण्यासाठी राजकारण करत आहेत.  निर्णय आपला आपण करायचा आहे, देशाचे भाग्य घडवणाऱ्या राजकारणात जायचं. की आपल्या कुटुंबाच्या सदस्यांचे राजकारण  आणि भाग्य  घडवणाऱ्यासोबत जायचे, हा त्यांचा वयक्तिक निर्णय आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यानंतर कोण झाले? राजीव गांधी यांच्यानंतर  सोनिया गांधी त्यांच्यानंतर राहुल गांधी... शरद पवार यांचे कुटुंब काय? खासदार आपली सुप्रिया ताई, पुतण्या उपमुख्यमंत्री म्हणून आहे. भारतीय जनाता पार्टीने म्हणून अपवादही राहू नये म्हणून 2024 ची निवडणूक लढताना परीवरावाद दूर ठेवला जाणार आहे. 


अंबादास दानवे यांनी खाजगी स्वरूपामध्ये  झेंडा वंदन केलं असेल तर त्यांना तो अधिकार आहे. तिरंगा फडकवण्याच्या  दृष्टीकोनातून सर्वोच्च नायालयाने आपल्या सगळ्यांना अधिकार दिला आहे. देव असेल की दानवे असेल, प्रत्येकाला झेंडा फडकवण्याचा अधिकार आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.