Manoj Jarange Patil: मराठ्यांच्या नोंदी रद्द करायला लावत आहेत हे लोकांना पटत नाही. हैद्राबाद गॅझेट सातारा संस्थान या ठिकाणी नोंदी आहेत. आमच्याकडून ओबसी बंधावाला (OBC) दुखावणार नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं विधान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं. हिंगोलीमध्ये मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. सरकारने मला उघडा पडायचं आणि संपवण्याचे ठरवले आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. कुटुंबाला मी बाजूला ठेवले आहे त्यामुळे समाजाने (Maratha Reservation) मला उघडा पाडू देऊ नये, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांनाही पाडा-
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार उभे करायचे ठरवले, तर सर्व जाती-धर्मातील उमेदवार देऊ, सर्व जाती धर्मातील उपमुख्यमंत्री करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तसेच मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांनाही पाडा, असं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे. मला राजकारणात जायचं नाही माझा जन चळवळीवर विश्वास आहे. तुम्ही आत्महत्या करू नका, तुम्ही आत्महत्या करत असल्याने मी खचतोय. लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं.
सगळ्या आरक्षणाची पुर्नरचना झाली पाहिजे-
सगळ्या आरक्षणाची पुर्नरचना झाली पाहिजे. मुस्लिम, ब्राह्मण आणि मारवाडी समाजाला अरक्षण दिले पाहिजे. 1884 च्या नोंदी आहेत. त्यामुळे आम्हाला समजून घ्यावे. ओबीसीच्या कोणत्याही नेत्याला विरोधक किंवा शत्रू मानलं नाही.सर्व जाती धर्माला सगेसोयरे आधीसूचना लागू होईल, असं मनोज जरांगे म्हणाले.
आज परभणीत शांतता रॅली-
मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज परभणीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता ही रॅली नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून निघेल तर मुख्य बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत निघणार आहे. याच ठिकाणी रॅलीचा समारोप होऊन मनोज जरांगे उपस्थित सकल मराठा समाजाला संबोधित करणार आहे. यासाठीची सर्व तयारी झाली असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला गडाचे स्वरूप देण्यात आलेला आहे.
मराठा कुणबी एकच- मनोज जरांगे
दरम्यान हिंगोलीतून निघालेल्या मराठा शांतता जनजागरण रॅलीत मराठा कुणबी एकच आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची जबाबदारी तुमची आहे असे म्हणत या रॅलीतून त्यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. हिंगोलीच्या मराठ्यांनी मराठ्यांची शान राखली आहे. ज्या ज्या वेळी मराठ्यांवर संकट येतील, त्या त्या वेळेस हिंगोली जिल्हा ताकदीने उभा राहील. माझं राज्य सरकारला जाहीर सांगणे आहे की, मराठा समाजाचा हा आक्रोश आहे. मराठा समाज स्वतःच्या न्यायासाठी रस्त्यावर आलाय, असं मनोज जरांगे म्हणाले.
संबंधित बातमी: