Santosh Bangar: सद्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर कमालीचे चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार बांगर यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला होता, त्यानंतर बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र आता आमदार बांगर पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आहे. कारण बांगर यांच्या एका समर्थकाने शिवसेनेच्या एका महिला पदाधिकारी आयोध्या पोळ यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. 

ऑडीओ क्लिपमधील संभाषण...

बांगर यांचा कार्यकर्ता: जय महाराष्ट्र..तुम्ही एक बातमी लावली ना ताई, मी फेसबूकला पाहिलं...तुम्ही अयोध्या पौळचं बोलताय ना

अयोध्या पोळ: हो..

बांगर यांचा कार्यकर्ता: हा संतोष बांगरजीला तुझ्या घरासमोर आणतो, तिथं येऊन दाखवती का तू? 

अयोध्या पोळ: मी....चालतंय कुठं आणताय गाडीत? 

बांगर यांचा कार्यकर्ता: तुझ्या औकात आहे का होय,तुझ्या...खेटायली का तू? 

अयोध्या पोळ: कुणासोबत?  

बांगर यांचा कार्यकर्ता: तुझ्या बापा सोबत खेटायली का तू ,संतोष बांगर तुझा बाप आहे.

अयोध्या पोळ: बर...बर...बर...

बांगर यांचा कार्यकर्ता: तुझ्यावर *** आणून बसवतो...संतोष बांगर

अयोध्या पोळ: बर...बर...बर...बोल... बोल... चांगले संस्कार आहेत... बोल भाऊ... जा गुन्हा दाखल कर जा…अयोध्या पोळ तुझं नाव काय रे?अरे...

बांगर यांचा कार्यकर्ता: नाही... तुझ्या *** दम आहे तर ये हिंगोलीत...

अयोध्या पोळ: अरे आली होती ना, दोन दिवस. मी हिंगोलीत होते...

बांगर यांचा कार्यकर्ता: शिवाजी पुतळ्याजवळ जाऊन लपू लागली...

अयोध्या पोळ: अरे दोन दिवस मी इथे होते ना...

बांगर यांचा कार्यकर्ता: तुझी औकात आहे का, तुझ्या अंगावर कपडे नाहीत, संतोष बांगर चप्पल घालतंय... हॅलो...

या सर्व प्रकारावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोध्या पोळ यांना फोन केला आणि पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल करण्याचे सांगितले. उद्धव ठाकरे आणि आयोध्या पोळ यांच्यात काय संवाद झाला पाहू यात...

उद्धव ठाकरे: हॅलो

अयोध्या पोळ: साहेब,जय महाराष्ट्र

उद्धव ठाकरे: जय महाराष्ट्र, तुझा मेसेज मिळाला तो टेलिफोनचा, फक्त काळजी घे...

अयोध्या पोळ: हो साहेब, मला ना जेव्हापासून ही गद्दारी झाली ना, तेव्हापासून मला रोज प्रॉब्लेम आहे...

उद्धव ठाकरे: एक काम, पहिलं म्हणजे रीतसर तक्रार करून ठेव, करणार काही नाहीत, फक्त ते असंच डिवचून-चिडवून चूक करायला लावतील

अयोध्या पोळ: हो...

उद्धव ठाकरे: आणि सोबत कुणी असतं का आपले सैनिक वगैरे?

अयोध्या पोळ: मुंबईत मी एकटीच असते, बाकी सगळे परभणी जिल्ह्यात पाल मध्ये असतात.. साहेब इथे ना...

अयोध्या पोळ: भायखळ्यात मी 19 व्या मजल्यावर राहते... आणि 23 व्या मजल्यावर मुली ठेवल्या आहेत रेकी करण्यासाठी...

उद्धव ठाकरे: एक काम कर, तू मुंबईत असतेस ना,

अयोध्या पोळ: हो.…

उद्धव ठाकरे: मी सिपींना सांगतो, सिपींकडे सुद्धा रीतसर तक्रार करून ठेव..

महत्वाच्या बातम्या...

आमदार बांगर यांच्या गाडीवर हल्ला प्रकरणी 11 जण ताब्यात; बांगर म्हणाले, ...अन्यथा 'एक घाव दोन तुकडे केले असते'

आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला, 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा