Maharashtra: मुसळधार पावसामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. परंतु हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सेनगाव (Sengaon) तालुक्यातील तीन मंडळांना मदतीपासून वगळण्यात आल्यानं तेथील शेतकरी मागील चार दिवसांपासून संपावर आहेत. आम्हाला तत्काळ मदत द्या अन्यथा आंदोलन असंच सुरुच राहील, असा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. दरम्यान, शेतकऱ्यांनी गोरेगाव येथे मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढल्यानं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


दरम्यान, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली. परंतु, सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना या मदतीपासून  वगळण्यात आलं. त्यामुळं 4 दिवसापासून शेतकरी संपावर आहेत.  काल गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलन केलं होतं.  त्यामुळं पोलिसांनी 10-15 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत


संपकरी शेतकऱ्यांचा इशारा 
पावसामुळं झालेल्या नुकसानीसाठी राज्यशासनाच्या वतीनं मदत जाहीर करण्यात आली होती. परंतु या मदतीपासून सेनगाव तलुक्यातील तीन मंडळ वगळण्यात आलंय. या भागात पाऊस कमी झाला आहे आणि शेतीचं नुकसान झाले नसल्याचा ठपका ठेवत या मंडळातील जवळपास 40-45 गावांमधील शेतकऱ्यांना नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहावं लागतंय. त्यामुळं तालुक्यातील शेतकरी संपावर गेले आहेत. शेतकरी गेल्या चार दिवसापासून संपावर आहेत. गोरेगाव येथील आप्पर तहसील कार्यालयासमोर शेतकरी  निदर्शनं करत आहेत.  शेतकऱ्यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत आंदोलन केले होतं. त्यामुळे गोरेगाव पोलिसात 10-15 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलं आहेत त्यामुळं आज शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसेच आम्हाला तत्काळ मदत द्या आशि मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अन्यथा आंदोलन आसेच सुरू राहणार, असा इशाराही संपकरी शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघतोय की? आंदोलन असंच पुढं राहील, हे पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल.


हे देखील वाचा-