हिंगोली : जिल्ह्यात सार्वजनिक नवरात्र उत्सव (Navratri Utsav) साजरा होणार असून, 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे. तसेच, नवरात्र उत्सवादरम्यान हिंगोली, कळमनुरी, वसमत या ठिकाणी दसरा (Dussehra) प्रदर्शनाचे अयोजन करण्यात येते. तसेच या काळात हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच नागरिकांच्या वतीने विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्यात त्यांच्या मागणी संदर्भात मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  06 ऑक्टोबर रोजी 6 वाजल्यापासून ते 20 ऑक्टोबरच्या 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे. याबाबत, मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून कळवण्यात आले आहे. 


अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार, शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. सोबतच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास  सक्त मनाई करण्यात आले आहे. 


तसेच, जिल्ह्यात आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करता येणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगता येणार नाही किंवा ठेवता येणार नाही. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत, असे आदेशात म्हटले आहे.


यांना आदेश लागू होणार नाही...


मात्र, हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी दिलीप कच्छवे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.    


इतर महत्वाच्या बातम्या: 


Hingoli News : पैसे मागणाऱ्या पीक विमा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी शिकवला धडा; हात बांधून थेट पोलीस ठाण्यात नेले