Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात संजीवनी अभियानांतर्गत (Sanjeevani Mission) जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तीन लाख महिलांचं (Womens) सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये 13900 महिला कॅन्सर (Cancer) संशयित असल्याचं आढळून आलं आहे. संशयित महिलांना कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे? या संदर्भात पुढील तपासण्या करून त्यांच्यावर योग्य तो उपचार केले जाणार आहेत. 

महिलांमध्ये प्रामुख्याने गर्भपिशवीचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर आणि मुखाचा कॅन्सर हे तीन प्रकारचे कॅन्सर आढळून येतात. त्यानुसार हे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. 13900 संशयित महिलांच्या लवकरच आता तपासण्या केल्या जाणार असून कॅन्सर झालेल्या महिलांवर लवकरच उपचार सुद्धा केले जाणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी दिली आहे. 

नेमकी कशी राबवली मोहीम?

याबाबत हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले की, जिल्ह्यातील महिलांमध्ये कर्करोगाचे काही लक्षणे असतील तर त्याचे निदान करण्यासाठी आपण 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त संजीवनी अभियान सुरू केले होते. या अभियानांतर्गत तब्बल तीन लाख महिलांची आपण आशा वर्कर्समार्फत सर्वेक्षण केले. सर्वेक्षणानंतर 13900 महिलांना संबंधित लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे आता 13900 महिलांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच त्यांच्यावर उपचार देखील केले जाणार आहेत. आशा वर्करच्या माध्यमातून डोअर टू डोअर स्क्रिनिंग करण्यात आले होते. प्रश्नावली तयार करून आशा वर्कर्सला ट्रेनिंग देण्यात आले होते.

त्यांनी महिलांना प्रश्न विचारून काही लक्षणे आहेत का? याबाबत माहिती जाणून घेतली होती. त्यानुसार 13900 महिलांची यादी तयार करण्यात आली आहे. तर स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील महिलांना होत असल्याचा देखील या तपासण्यामधून स्पष्ट झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, कर्करोग होऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून एचपीव्हीची लस जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिलांसाठी देण्याबाबत तालुकास्तरावर शिबिरं आयोजित करावीत. त्यासाठी आठ दिवसात रूपरेषा तयार करा, अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक तालुका आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Gold Price: पैसे तयार ठेवा, सोन्याचा भाव कोसळायला सुरुवात; तीन दिवसांत 4000 रुपयांची घसरण, चांदीचा भाव 11 हजारांनी खाली पडला

Pune Crime : शेअर मार्केट ट्रेडिंगचं दाखवलं आमिष, उच्चशिक्षित तरूणांकडून आजोबांना तब्बल दीड कोटीचा गंडा, पुण्यातील धक्कादायक प्रकार