हिंगोली : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून. त्यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोलीत (Hingoli) डिग्रस कर्‍हाळे फाटा येथे 110 एकरवर सभा पार पडणार आहे. या सभेची सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी दोन क्विंटल फुलांचा हार आणि 76 तोफांची सलामी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांची हिंगोलीत सभा झाली होती आणि त्यानंतर आता त्याच हिंगोलीत मनोज जरांगे यांची सभा होत आहे. 


हिंगोली जिल्ह्याची सभा डिग्रस कर्‍हाळे फाटा येथे 7 डिसेंबर रोजी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला मनोज जारांगे पाटील हिंगोली येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत, यावेळी दोन क्रेनच्या माध्यमातून 2 क्विंटलचा हार घालण्यात येणार आहे. तसेच 101 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. 110 एकवर ही सभा पार पडणार असून सभेसाठी 40 बाय 20 व 12 फुट उंचीचे मुख्यस्टेज तयार करण्यात आले आहे. स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 11 फुट उंच पुतळा ठेवण्यात येणार आहे. स्टेज भोवती 50 फुटांचा डि झोन तयार करण्यात आला असून दुसर्‍या स्टेजवर सभा सुरू होण्यापुर्वी पोवाडे व निवडक मुलींचे भाषण होणार आहेत. 


अशी होणार जरांगेंची सभा...



  • मनोज जरांगे बारा वाजता हिंगोली शहरात दाखल होतील

  • 2 क्विंटल फुलांचा हार क्रेनच्या साह्याने घालत मनोज जारांगे यांचे स्वागत

  • मनोज जरांगे हे 12 वाजता हिंगोली शहरातील शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करणार

  • त्याठिकाणी  25 तोफांची सलामी दिली जाणार 

  • त्यानंतर हिंगोली शहरातून जरांगे सभा स्थळी डीग्रस फाटा येथे रवाना होतील. यावेळी मोटर सायकल रॅली निघू शकते

  • 76 तोफांची सलामी देत जरांगे यांचे सभास्थळी स्वागत होणार 

  • मनोज जरांगे यांच्या सभेसाठी 40 बाय वीस आणि बारा फूट उंच असलेल्या स्टेजची निर्मिती

  • स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 15 फुटी पुतळा असणार 

  • सभेमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता प्रशासनाने हिंगोली ते औंढा नागनाथ या महामार्गावरील सर्व वाहतूक बंद केली आहे

  • सभा संपल्यानंतर मनोज जरांगे दोडगांव येथे आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबाला भेट देणार आहेत 


सभा स्थळाची तयारी 



  • अडीचशे एकरवर सभा होणार 

  • दीडशे एकरवर पार्किंग तर 110 एकरवर सभा होणार

  • सभा सुरू होण्यापूर्वी पोवाडे आणि निवडक मुलींचे भाषण होणार 

  • सभेसाठी प्रशिक्षण दिलेले पाच हजार स्वयंसेवक सेवा देणार 

  • 200 भोंगे आठ डीजे बॉक्ससह 300 फोकस, सहा ड्रोन कॅमेरे, आठ एलईडी वॉल आसणार 

  • सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निगराणी ठेवण्यासाठी चार टेहळणी टॉवर 

  • प्रवेशासाठी सहा मुख्य प्रवेशद्वार असणार आहे 

  • पार्किंगच्या ठिकाणी 40 अन्नछत्राचे स्टॉल असणार, त्या माध्यमातून खिचडी, पुरी, ठेचा, चपाती, चिवडा उपमा यासारखे 300 क्विंटल भोजन व्यवस्था असणार 

  • याशिवाय केळी बिस्कुट आणि पाण्याच्या बॉटल सुद्धा असणार .

  • जमणारी गर्दी लक्षात घेता एकूण चारशे डॉक्टर्स, पाच ठिकाणी मेडिकल कॅम्पसह शंभर बेडची व्यवस्था आणि दहा रुग्णवाहिका असणार 

  • दोन अग्निशामक दलाच्या गाड्या आणि महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange : 'आरक्षण दोन दिवस उशिराने मिळालं तरी चालेल', जरांगेंनी आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली?