हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) डिग्रस फाटा येथे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जाहीर सभा आयेाजित करण्यात आली आहे. या सभेसाठी हिंगोली जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे सभास्थळ हिंगोली ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावरील डिग्रस फाटा येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे यांच्या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तर, ही सभा 110 एकरवर होणार असून, यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी हिंगोली ते औढामार्गे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तर, वाहतुकीसाठी बंद असलेल्या मार्गासाठी पर्यायी मार्ग सुरु असणार आहे.
वाहतूक मार्गात असा बदल असणार...
वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग (7 डिसेंबर रोजी)
- जिंतूर टी पॉईंट वसमत ते औंढा-हिंगोलीकडे येणारी जड वाहनेनागेशवाडी फाटा ते औंढा-हिंगोलीकडे जाणारी जड वाहने
- हिंगोलीकडून औंढा ना.–परभणीकडे जाणारी जड वाहने
- औंढा ना. ते हिंगोलीकडे जाणारी जड वाहने
- बोरजा फाटा ते हिंगोलीकडे जाणारी पूर्ण वाहने
- नरसी टी पॉईंट ते औंढा ना. कडे जाणारी पूर्ण वाहने
- लोहगाव ते डिग्रस पाटीकडे येणारी सर्व वाहने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग :
- नांदेडकडून जिंतूर टी पॉईंट वसमत-औंढा-हिंगोलीकडे येणारी वाहने जिंतूर टी पॉईंट वसमत कौठा पाटी-कुरुंदा-बोल्डा-उमरा फाटा मार्गे हिंगोली जातील.
- परभणीकडून औंढा मार्गे हिंगोली येणारी वाहने ही झिरो फाटा-नागेशवाडी-वाई शिरळी-बोल्डा-उमरा फाटा मार्गे हिंगोली जातील.
- अकोला व वाशिमकडून हिंगोली-औंढा मार्गे परभणी जाणारी वाहने ही राष्ट्रीय महामार्गाने उमरा मार्ग-बोल्डा-सिरळी वाई नागेशवाडी मार्गे परभणी जातील.
- अकोला-वाशिमकडून नांदेडकडे जाणारी वाहने हायवेने बायपास मार्गे हिंगोली जातील. भोसी ते डिग्रस मार्गे हिंगोलीकडे येणारी वाहने ही लोहगाव-केसापूर मार्गे हिंगोली जातील.
- डिग्रस गावातून डिग्रस फाटा मार्गे हिंगोली येणारी वाहने लोहगाव-केसापूर मार्गे हिंगोलीकडे जातील.
- औंढा ते हिंगोली जाणारी हलकी वाहने व मोटार सायकल बोरजा-लोहगाव-केसापूर मार्गे हिंगोलीकडे जातील.
- औंढा हून कळमनुरी जाणारी हलकी वाहने पिंपळदरी-नांदापूर-उमरा मार्गे कळमनुरी कडे जातील.
वरील दिवशी वाहतूक मार्गात केलेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: