हिंगोली : महायुतीकडून (Mahayuti) हिंगोली लोकसभा मतदारसंघात (Hingoli Lok Sabha Constituency) शिंदेसेनेचे हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजपमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्वच भाजप नेते हेमंत पाटील यांच्या उमेदवारीच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, याचे पडसाद आता भाजपच्या पक्षातील अंर्तगत बैठकीत देखील उमटताना पाहायला मिळत आहे. कारण हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे. 


आज हिंगोली लोकसभा मतदारसंघामधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाजपचे इच्छुक उमेदवार रामदास पाटील सुमठानकर दाखल होताच, बैठकीत गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले आहे. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून नाराज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. रामदास पाटील सुमठानकर यांना उमेदवारी मिळावी आशा मागणीसाठी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. भाजपच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी महायुतीमधील उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध केला जातोय. विशेष म्हणजे आजच्या बैठकीला भाजपचे जिल्ह्यातील सर्वच आमदार उपस्थित होते, ज्यात भीमराव केराम, नामदेव ससाणे, तान्हाजी मुटकुळे यांचा समावेश आहे. 


महायुतीमधील भाजपमध्ये हेमंत पाटील यांच्याबद्दल प्रचंड नाराजी


हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठी नाराजी आहे. अजून वेळ गेलेली नाही, त्यामुळे उमेदवार बदलावा. भाजपला उमेदवारी देऊ नका, मात्र शिंदेसेनेचा उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपमधून केली जात आहे. महायुतीमधील भाजपमध्ये हेमंत पाटील यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेत अनेक चांगले उमेदवार असून, त्यांना संधी द्यावी अशीही मागणी सुद्धा केली जात आहे. 


भाजपच्या बैठकीत जोरदार घोषणाबाजी...


महायुतीमध्ये अनेक मतदारसंघात नाराजीनाट्य पाहायला मिळाले. उमेदवारी जाहीर होईपर्यंत तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याचं देखील काही मतदारसंघात दिसून आले. हिंगोली लोकसभा मतदारसंघात देखील सुरुवातीपासून अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. भाजप विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष उमेदवारीवरून सुरू होता. शेवटी शिंदे गटाकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधून मोठा विरोध होत आहे. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून आज भाजपची आढावा बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत देखील याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत अनेक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे आगामी काळात हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिंदेसेना विरुद्ध भाजप हा वाद वरिष्ठ कसा सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Hemant Patil : महायुतीत ऑल इज नॉट वेल! अजूनही वेळ गेलेली नाही शिवसेनेने उमेदवार बदलावा, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर भाजपची नाराजी