Case Registered Against Babanrao Taywade: ओबीसी नेते (OBC Leaders) बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आगे. हिंगोली (Hingoli) शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 26 नोव्हेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) रामलीला मैदानावरील (Ramlila Maidan) वक्तव्य तायवाडे यांना भोवलं आहे. "ओबीसी (OBC) विरोधात बोलणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याची ताकद ठेवा", असं वक्तव्य बबनराव तायवाडे यांनी केलं होतं. त्यांनतर मराठा समाजाच्या (Maratha Reservation) वतीनं तक्रार देण्यात आली होती. 


बबनराव तायवाडे यांना जाहीरपणे चिथावणीखोर वक्तव्य (Provocative Statement) करणं भोवलं आहे. ओबीसीच्या एल्गार मेळावामध्ये (OBC Elgar Melava) चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसांत (Hingoli City Police) बबनराव तायवाडे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 नोव्हेंबर रोजी हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसीचा एल्गार करण्यात आला होता. या एल्गार मेळाव्यामध्ये ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी ओबीसींविरोधात बोलणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याची ताकद ठेवा, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मराठा समाज (Maratha Samaj) आक्रमक झाला होता. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसांमध्ये मराठा समाजाच्या वतीनं तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर बबनराव तायवाडे यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


काय म्हणाले होते बबनराव तायवाडे? 


मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. यासाठी हिंगोलीत (Hingoli) ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, ओबीसींच्या विरोधात बोलल्यास जरांगे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचे तायवाडे म्हणाले होते. तसेच, याच मेळाव्यात बोलताना बबनराव तायवाडे यांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, "यापुढे जर असा आमचा अपमान केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही. ओबीसींच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली, त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यात ठेवा. तसेच, मनोज जरांगे यांचं जाहीर धिक्कार करतो. 32 लाख नोंदी सापडल्या असं जरांगे म्हणाले. किती मुर्ख आम्हाला बनवत आहे. एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंदी आहेत." 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ओबीसी नेते बबनराव तायवाडेंना हिंगोलीच्या सभेतील वक्तव्य भोवलं; हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा दाखल