हिंगोली :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP)  जनसन्मान यात्रेदरम्यान (Jansanman Yatra)  लातूरच्या (Latur)   सभेवेळी गोंधळ झाला. अजित पवार यांचं भाषण सुरू असताना स्टेजवर काही मराठा आंदोलक आले आणि त्यांनी अजित यांना भूमिका स्पष्ट करायला सांगितलं. हिंगोलीच्या वसमतच्या सभेवेळी हा प्रकार घडला. अजित पवार (Ajit Pawar)  बोलत असताना काही मराठा कार्यकर्तांनी गोंधळ केला. अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतची (Maratha Reservation)  भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. 


हिंगोलीतल्या वसमतमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी केली.  अजित पवारांचं भाषण सुरू होताच मराठा आंदोलक आक्रमक झाले.   वसमतमध्ये  अजित पवार यांच्या नेतृत्वात जन सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती.  या निमित्ताने वसमत शहरातील मयूर मंगल कार्यालय परिसरात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.   या सभेत भाषणाला आजित  पवार उभे टाकताच मराठा आंदोलकांनी सभेत गोंधळ घातला आहे एक मराठा लाख मराठा आशा घोषणांनी स्टेज परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता.


मराठा आंदोलक दाखल झाल्याने पोलिसांचा चांगलाच गोंधळ उडाला 


मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक दाखल झाल्याने पोलिसांचा चांगलाच गोंधळ उडाला होता.  शेवटी पोलिसांनी मध्यस्ती करत आंदोलकांना सभा स्थळापासून बाजूला नेत हे आंदोलन शमविले आहे या ठिकाणी  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहोत परंतु पोलीस बळाचा वापर करून आम्हाला   निवेदन  देऊ दिलं जातं नाही आसा आरोप आंदोलकांनी केला आहे.


महिला अत्याचार प्रकरणांवरुन महिलावर्गात रोष 


महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडलेल्या महिला अत्याचार प्रकरणांवरुन महिलावर्गात चांगलाच रोष आहे.  लातूरात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडली. या सभेला मोठ्या संख्येनं महिलांनी उपस्थिती लावली. अजित पवारांच्या भाषणावेळी एका महिलेने भर सभेत उठून 'दादा महिलांना सुरक्षा द्या' अशी मागणी केली. महिलेच्या मागणीची तात्काळ दखल घेत अजितदादांनी काय घोषणा केली .


अजित पवारांनी मागितली माफी


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji maharaj) वाऱ्यामुळे पडला. मात्र, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातील तेरा कोटी लोकांची जाहीर माफी मागतो. यातील सर्व दोषी लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे म्हणत अजित पवार यांनी पुतळा दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागितली आहे. 


हे ही वाचा :


''मी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो, तुम्हाला शब्द देतो ''; अजित पवारांनी हात जोडले