Heatwave : एकीकडे जून महिन्याची सुरूवात झाली आहे. लोक पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अशातच मान्सून (Mansoon) लांबणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. यामुळे तापमान (Temprature) दिवसेंदिवस वाढत आहे. एवढेच नाही तर हवामान खात्याने अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेबाबत आॅरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केले आहेत. त्यामुळे आता परत एकदा लोकांना उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे. सुर्यकिरणांच्या वरचे वर वाढणाऱ्या तापमानामुळे दुपारच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. परिणामी मान्सून येईपर्यंत लोकांन कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे.


तर देशाच्या भागात दुसऱ्या ठिकाणी केरळमध्ये मान्सूनचे नुकतेच आगमन झाले आहे. मृग नक्षत्राच्या (Mruga Nakshtra) मुहुर्तावर केरळमध्ये पावसाचे आगमन दिमाखात झाले आहे. मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच मान्सून आल्याने शेतकरी सुखावले आहेत. यंदा भारतात मान्सून 18 जूनपर्यंत दाखल होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. पण दिवसांचा काहीसा फरक लक्षात घेता 14 ते 22 जूनच्या दरम्यान येऊ शकतो. बिपरजाॅय चक्रिवादळामुळे महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मान्सून देशात दाखल होण्यासाठी जवळपास एक आठवडा उशिर झाला असून लोक उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानाता हा पारा वाढलेला असून हवेतीव आद्रताही (Humidity) मोठ्या प्रमाणारवर वाढलेली आहे. घामाघूम होत असलेले लोक एसी (AC) , पंखे (Fans) , कुलर (Cooler) जास्त प्रमाणावर वापरत असून विजेच्या (Electricity) मागणीतही प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अशातच वाढत्या तापमानाचा अंदाज घेता Ministry Of Health And Family Welfare ने लोकांसाठी काही टिप्स दिल्या आहेत. त्यात तिव्र तापमानापासून संरक्षण कसे करावे सांगण्यात आले आहे. 






कशी घ्यावी काळजी (How To Take Care Of Yourself)


.  उन्हाची अधिक तीव्रता असताना स्वयंपाक बनवू नये. (Avoid Cooking During Summer)
. स्वयंपाक बनवताना खिडक्या आणि दारे कायम उघडी ठेवावीत. (Open Doors And Windows During Cooking)
. जास्त प्रमाणात प्रोटीन असलेले पदार्थ खाऊ नयेत.तसेच शिळे अन्न खाणे टाळावे. (Avoid High Protein food And Do Not Eat Stale Food)
. मद्यपान, चहा, काॅफी ही पेय उन्हाळ्यात पिणे टाळावे. (Avoid Alcohol , Tea , Coffee During Summer)


 


इतर महत्वाच्या बातम्या


पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती