Health: मॅरेथॉनमध्ये धावणे आनंददायक आणि उत्साहवर्धक असू शकते. मात्र, ज्यांना एखादी वैद्यकीय समस्या असेल त्यांनी या बाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण, मॅरेथॉनपेक्षा जीवन अधिक महत्त्वाचे आहे. मॅरेथॉनसाठी सज्ज होणाऱ्या सर्व धावपटूंसाठी डॉक्टरांनी एक महत्त्वाची चेकलिस्ट येथे दिली आहे. याबाबत एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे सीनियर कार्डिओलॉजिस्ट आणि टाटा मुंबई मॅरेथॉनचे वैद्यकीय संचालक डॉ. संतोष कुमार डोरा यांनी मॅरेथॉनपटूंच्या वैद्यकीय फिटनेसंदर्भात मत व्यक्त केले आहे. जाणून घेऊया..


खालील गोष्टी तुमच्याशी संबंधित असतील, तर तुम्ही मॅरेथॉन धावू नये -


तुम्हाला हृदयविकार असेल आणि त्यावर उपचार केले नसतील किंवा हृदयविकारावरील उपचार पूर्ण झालेले नसतील.


तुमच्या डाव्या निलयाची (व्हेंट्रिक्युलर) पंपिंगची कार्यक्षमता कमी झाली असेल (सामान्य पंपिंग कार्यक्षमता 50-60 टक्क्यांपेक्षा जास्त असते).  


हृदयाच्या स्नायूंवर किंवा ठोक्यांवर परिणाम करणारे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपथी, लाँग क्यूटी सिंड्रोम, कॅटेकोलामाइनमुळे होणारा पॉलिमॉर्फिक व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, ब्रुगाडा सिंड्रोम असे दुर्मीळ अनुवंशिक आजार तुम्हाला असतील.


तुमच्या रक्तदाबाच्या पातळीत तीव्र चढ-उतार होत असेल आणि या संदर्भात तुम्ही डॉक्टरांचे मत घेतले नसेल.


धावताना हृदयाचे ठोके अतिशय जलद किंवा खूपच मंद होण्याचा अऱ्हिदमिक डिसऑर्डर नावाचा हृदयविकार असेल.


तुमची बासपास शस्त्रक्रिया झाली असेल आणि त्यानंतर 3 महिन्यांचा रिकव्हरीचा कालावधी आणि 6 महिन्यांचा सराव झाला नसेल.


तुमची अँजिओप्लास्टी झाली असेल आणि तुमचा 1 महिन्यांचा रिकव्हरीचा कालावधी आणि 6 महिन्यांचा सराव झाला नसेल.


तुम्ही रक्तातील शर्करा, रक्तदाब आणि सीएसी स्कोअर (सीटी कॅल्शिअम स्कोअर) यासारख्या अनिवार्य मॅरेथॉनपूर्व चाचण्या केल्या नसतील.


तुमचा सीटी कॅल्शिअम स्कोअर 300 हून अधिक असेल किंवा सीटी कॅल्शिअम स्कोअर 100 पेक्षा अधिक असेल


अति प्रमाणात शारीरिक श्रम केल्यावर धमन्यांमध्ये असलेला प्लाक लक्षणीय प्रमाणात अडथळा निर्माण करू शकतो, असे तुमच्या स्ट्रेस टेस्टमध्ये आढळले असेल.


मॅरेथॉन धावण्यासाठी तुम्ही सुयोग्य मार्गदर्शनाखाली सराव केला नसेल.


मॅरेथॉन धावणे फिटनेससाठी छान आहे, पण ती एक मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचे भान तेवढ्याच गांभीर्याने ठेवले पाहिजे.


 


हेही वाचा>>>


Winter Health: हिवाळ्यात घरातच बसणाऱ्यांनो सावधान! आठवडा, महिनाभर उन्हात न गेल्याने होऊ शकतात 'हे' गंभीर आजार, कसे टाळाल? जाणून घ्या..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )