Gondia News : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील मानेगाव शेत-शिवारात जंगली डुक्कर (Wild Boar) मारण्याच्या हेतूने अवैधपणे इलेक्ट्रिक करंट (Electric Current) लावून ठेवलेला होता. मात्र यात भलतंच काही घडलं. विद्युत करंट लावणाऱ्या टोळीतील एका सहकाऱ्याचा करंट लागल्याने मृत्यू झाला. इतकंच काय तर सहकाऱ्याचा मृत्यू झाला. ही बाब कुणाला कळू नये म्हणून आरोपींनी गुप्तता पाडली होती. या प्रकरणी मृत अशोक कोहळे यांच्या मामाने अशोक बेपत्ता (Missing)) असल्याची तक्रार दाखल केली होती. यावरुन या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश झाला आहे. 


सेन्ट्रिंगच्या तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरु केला आणि करंट लागून सहकाऱ्याचा मृत्यू झाला


यात आमगाव पोलिसांनी तपास करुन एका आरोपीला अटक केली. अशोक मडावी (वय 26 वर्षे), दुर्गेश बिहारी (वय 35 वर्षे), राधेश्याम ठाकरे (वय 40 वर्षे) आणि मृत अशोक कोहळे यांनी जंगली डुक्कर मारण्याकरता पांडेबाई यांच्या शेतात खुंट्या गाडून त्यावर सेन्ट्रिंगचे तार लावले. इलेक्ट्रिक पोलच्या तारेला वायरने जोडून पांडेबाईच्या शेतापर्यंत गेलेल्या वायरला वायर जोडून निष्काळजीपणे सेन्ट्रिंगच्या तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरु केला. जंगली डुक्कर मारण्यासाठी त्यांनी लावलेल्या विद्युत करंटमध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो हे माहित असताना सुद्धा त्यांनी करंट लावला. त्यामध्ये अशोक कोहळे याला विद्युत करंट लागून तो मरण पावला. 


मृतदेह इलेक्ट्रिक पोलजवळील सागाच्या झाडामध्ये ठेवला


"तो मृत्यूमुखी पडल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अशोक मडावी, दुर्गेश बिहारी, राधेश्याम ठाकरे यांनी सेन्ट्रिंग तार आणि वायर फेकून दिले. अशोक कोहळे यांचा मृतदेह महादेव पहाडी गडमाता मंदिराच्या मागे इलेक्ट्रिक पोल जवळील सागाच्या झाडामध्ये ठेवून पळून गेले," अशी माहिती आरोपीने तपासादरम्यान दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. 


एका आरोपीला बेड्या, दोन पसार


अशोक कोहळे परत न आल्याने त्यांच्या मामाने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केला असता नवी बाब समोर आली. डुक्कर मारण्याच्या उद्देशाने अवैधपणे इलेक्ट्रिक करंट लावला ज्यात त्यांच्याच सहकाऱ्याचा म्हणजेच अशोक कोहळे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आमगाव पोलिसांनी तपास करुन एका आरोपीला अटक केली आहे आणि दोन आरोपी सध्या फरार आहेत.


हेही वाचा


Gondia News कुक्कुटपालन शेडचा चेक मिळवण्यासाठी 12 हजारांच्या लाचेची मागणी, गोंदियाच्या पशुधन विकास अधिकारी आणि अन्य एकाला बेड्या