Gondia News : गोंदियाच्या (Gondia) पंचायत समिती पशुधन विकास अधिकाऱ्यासह अन्य एका इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) चमूने 10 हजार रुपये लाच (Bribe) स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. जयंतप्रकाश करवडे (वय 39 वर्षे)  महेंद्र घरडे (वय 50 वर्षे) अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत. 


तक्रारदाराने आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कुक्कुटपालनाकरता शेडची उभारणी केली होती. दरम्यान पहिल्या टप्प्याची रक्कम तक्रारदाराला मिळाली होती. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान 1 लाख रकमेचा धनादेश काढून देण्याकरता दोन्ही आरोपींनी 12 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराला ही रक्कम देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाला कळवले. तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचं ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडलं आहे.


शेड उभारणीचा दुसरा हफ्ता काढण्यासाठी 12 हजारांच्या लाचेची मागणी


तक्रारदाराने आपल्या शेतामध्ये कोंबड्यांची काही पिल्ले खरेदी करुन व्यवसाय थाटला होता. या व्यवसायाकरता शासनाकडून शेड बांधकामाकरता मदत देण्यात येते अशी माहिती मिळाल्यानंतर तक्रारदाराने पंचायत समिती गोंदिया इथे या योजनेच्या लाभ घेतला. या योजनेचा पहिला हफ्ता 68 हजार 500 रुपये तक्रारदारला मिळालेला होता. त्यानंतर उर्वरित 1 लाख रुपये तक्रारदाराला मिळाला नव्हता. याकरता पशुधन विकास अधिकाऱ्यांनी दुसरा हफ्ता काढायचा असेल तर 12 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली होती.  


सापळा रचून एसीबीच्या दोन अधिकाऱ्यांना अटक


मात्र तक्रारदाराला ही लाच देणं मान्य नव्हते. त्यांनी याची माहिती लागलीच गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग इथे दिली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून 10 हजार रुपये लाच स्वीकारताना पशुधन विकास अधिकाऱ्यासह त्याच्या एका साथीदाराला रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 


ही कारवाई राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., सचिन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक, अनामिका मिर्झापुरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि, पर्यवेक्षक अधिकारी विलास काळे पोलीस उपअधीक्षक ला. प्र. वि. गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पो. नि. उमाकांत उगले, सापळा कार्यवाही पथक पो. नि. उमाकांत उगले, पो. नि. अतुल तवाडे, स. फौ. विजय खोब्रागडे, पो. हवा. संजयकुमार बाहेर, पो.हवा. मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, नापोशि प्रशांत सोनवाने, मनापोशी संगीता पटले, चालक नापोशि दीपक बाटबर्वे यांनी ही कारवाई केली आहे.


हेही वाचा


Sunita Dhangar : लाचखोर धनगर मॅडमवर तर कारवाई, पण ज्याने तक्रार केली त्याची होतेय अडवणूक; दोन महिन्यानंतरही कामासाठी मारावे लागतात खेटे