Gondia QR Code : ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या ट्रेंडसोबतच ‘ऑनलाइन फसवणुकी’ च्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. ‘क्यूआर कोड’ च्या माध्यमातून लोक ऑनलाइन फसवणुकीलाही बळी पडत आहेत. किराणा दुकानात दोन अनोळखी इसमांनी खाद्य तेलाचे 5 कॅन खरेदी करण्याच्या हेतूने घेतले आणि दुकानात लावलेले क्यू आर कोडचे फोटो काढले. पैसे ट्रान्सफर करण्याच्या हेतूने पुढची प्रक्रिया केली मात्र त्यावर पैसे ट्रान्सफर होत नाही असे सांगुन मोबाईल वर वडीलाकडुन पैसे पाठवत आहोत असे सांगितले. असे सांगून दुकानदाराच्या मोबाईल वर 10,000/- रु जमा झाल्याचे संदेश पाठवले. आणि त्यानंतर दुकानदार अडकला ऑनलाईन फ्रॉडच्या जाळ्यात...
जगभरात ऑनलाइन व्यवहारांचा ‘ट्रेंड’ सातत्याने वाढतोय. लोक ऑनलाइन व्यवहारांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण वाढलंय. यासाठी लोक अनेक ‘ई-पेमेंट’ पद्धती वापरतात. मात्र ऑनलाइन व्यवहारांचा कल वाढत असल्याने ऑनलाइन फसवणुकीच्या (Online fraud) घटनांमध्येही वाढ होते आहे. ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी ठगांनी नवीन मार्ग शोधले आहेत. अशा अनेक युक्त्या आहेत ज्याचा वापर करून निरपराध लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांचे बँकिंग तपशील चोरतात.
किराणा दुकानात अनोळखी इसमांकडून खाद्य तेल खरेदी करण्याच्या निमित्ताने दुकानदारालाच गंडा
गोंदिया शहरातही अशीच घटना घडली. गोंदिया येथील एका किराणा दुकानात दोन अनोळखी इसमांनी खाद्य तेल खरेदी करण्याच्या निमित्ताने दुकानदारालाच गंडा घातलाय. दुकानात लावलेले क्यू आर कोड चे त्यांनी फोटो काढले. पैसे ट्रान्सफर करण्याच्या हेतूने पुढची प्रक्रिया केली मात्र त्यावर पैसे ट्रान्सफर होत नाही असे सांगुन मोबाईल वर वडीलाकडुन पैसे पाठवत आहोत असे सांगितले. वडीलांकडून पैसे पाठवत आहोत असे सांगुन दुकानदाराच्या मोबाईल वर 10,000/- रु जमा झाल्याचे संदेश पाठवले. त्यावरुन दुकानदाराने अधिक चे 775 रुपये ग्राहकाला म्हणजेच आरोपीला परत केले. खरे पाहता या सगळ्या प्रक्रियेत दुकानदाराच्या खात्यावर पैसे न पाठवता दुकानदाराचीच फसवणूक केली. त्याबाबत दुकानदार फिर्यादीने त्यांचे सहकारी आणि दुकानदार मित्रांचे व्हाटसअॅप ग्रुपवर ही घडलेली बाब सांगितली. घडलेला सगळा प्रकार सांगताच आणखी काही दुकानदारांसोबतही असेच घडल्याचे समोर आले. याच पद्धतीने दोन अनोळखी इसमानी इतर व्यापाऱ्यांचीसुध्दा अशाच प्रकारे फसवणूक केल्याचं ससोर आलं. याची तक्रार गोंदिया पोलिसांकडे करण्यात आली.
गोंदिया शहरातील दुकानदाराची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना गोंदिया शहर पोलिसांनी 24 तासात अटक करुन गजाआड केले. प्रतीक आचारी व रोहित शाहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपी हे छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहेत. या युवकांनी ऑनलाईन पेमेंटच्या नावावर फसवणूक केल्याची घटना 23 एप्रिलला घडली होती. CCTV च्या आधारे गोंदिया शहर पोलिसांनी तपास सुरू केला. यात 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या दोन्ही आरोपीकडून 64 हजार 200 रुपयांचे खाद्यतेलाचे 34 कॅन आणि 5 हजार रुपये रोकड असा एकूण 69 हजार 200 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींकडून गोंदिया जिल्ह्यांमधून आणखी अनेक व्यावसायिकांचीदेखील फसवणूक केली असल्याची बाब समोर आली आहे. घटनेचा पुढील तपास गोंदिया पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :