Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा वनपरिक्षेत्रात करण्यात आलेली रोपवन लागवड कामांमध्ये घोळ केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) आर. जी. मुन यांच्यासह दोन क्षेत्र सहाय्यक यांना निलंबित करण्यात आले आहे. शैलेश पारधी व अब्दुल शकील अब्दुल दुर्राणी असे निलंबित करण्यात आलेल्या क्षेत्र सहाय्यक यांची नावे आहेत. कामात अनियमितता केल्याची तक्रार वरिष्ठांपर्यंत झाल्यानंतर त्या कामांची चौकशी करण्यात आली. त्यात यांनी गैव्यवहार केल्याचे दिसून आले. यावरून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे. 


वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी. मुन व क्षेत्र सहाय्यक शैलेश पारधी यांनी सोनेगाव येथील एका व्यक्तीचा झाडावरून पडून मृत्यू झाला होता. मात्र त्यांनी रानडुकराच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला असे दाखवत शासकीय निधीचा अपहार केला होता. तसेच खैरलांजी परिसरामध्ये रोपवन कामामध्ये अनियमितता दाखवली होती.  यावरून त्यांचे निलंबन करण्यात आलं. तर तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही येथे रोपवन कामांमध्ये अनियमितता केल्याने अब्दुल शकील अब्दुल दुरानी यांचे निलंबन करण्यात आले आहे. 


भरधाव ट्रकची समोरील ट्रकला जोरदार धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू


भरधाव वेगात असलेल्या ट्रकची समोरील ट्रकला धडक बसल्याने मागील ट्रकच्या चालकासह वाहकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कोहमारा-देवरी दरम्यानच्या मासूलकसा घाट परिसरात घडली. साजिद खान (वय 30) आणि सादाब खान (वय 28) अशी मृत चालक व वाहकाची नावे आहे. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कोहमारा ते देवरीच्या दरम्यान मासूलकसा घाट परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे याठिकाणी एकेरी वाहतूक देण्यात आली आहे.


दरम्यान, नागपूरकडून रायपूरकडे जाणारा ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारले. यावेळी त्यामागून येणारा ट्रकच्या चालकाचा ट्रकवरून नियंत्रण सुटल्याने त्याच्या ताब्यातील ट्रकची समोरील ट्रकला धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की, ट्रक चालक आणि वाहक दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.


झोपेची डूलकी लागल्याने समृद्धी महामार्गावर ट्रेलरची ट्रकला मागून धडक


वाशिम जिल्ह्यात आज (22 फेब्रुवारी) पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील चॅनेल क्रमांक 235 वर ट्रेलरच्या चालकाला झोपेची डूलकी लागल्याने चालत्या ट्रकला मागून धडक दिली. या धडकेत ट्रेलरचा चक्काचूर झाला असून, यात ट्रेलरचा चालक जखमी झाला आहे. या अपघातात ट्रेलरच मोठा नुकसान झालाय. मागील काही दिवसापासून समृद्धी महामार्गावर अपघाताची सत्र सुरूच असल्याचे या निमित्याने पुढे आले आहे. 


हे ही वाचा