कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने शेतकऱ्यांना नववर्षाची भेट दिली आहे. आठवड्यात दुसऱ्यांदा दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. म्हैशीच्या दुधाला सरसकट 1 रुपया, तर उत्तम प्रतीच्या दुधाला अतिरिक्त 1 रुपया दरवाढ देण्यात येणार आहे.
  • 7 ते 9 फॅट असणाऱ्या दुधाला अतिरिक्त दरवाढ मिळेल.
  • तर गायीच्या उत्तम प्रतीच्या दुधाला अतिरिक्त 1 रुपये 20 पैसे वाढ मिळेल.
  • 3.5 ते 8.5 फॅट असणाऱ्या दुधाला अतिरिक्त दरवाढ मिळणार
  • गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी दूधखरेदी दरवाढीची घोषणा केली.
  • उद्या म्हणजेच रविवारपासून नवीन दरवाढ लागू होईल.