Goa Nightclub Fire: गोव्यातील नाईट क्लबमधील अग्निकांड प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. क्लबचे दोन्ही मालक देशसोडून पसार झाले आहे. नाइट क्लबच्या आगीत 25 नागरिकांच्या मृत्यूनंतर मालक इंडिगोच्या विमानानं रातोरात देश सोडून फरार झाल्याची माहिती आहे. रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील (Goa Nightclub Fire) मुख्य आरोपी सौरभ आणि गौरव लुथरा हे देश सोडून पळून गेले आहेत. अग्निकांडाची घटना घडल्यानंतर काही तासांनी सौरभ आणि गौरव यांनी मुंबईहून इंडिगोच्या विमानानं थायलंड मधील फुकेत गाठलं असल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

Continues below advertisement

बर्च बाय रोमियो लेन क्लबला शनिवारी रात्री आग लागली. या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास गोवा पोलीस करत आहेत. एफआयआर दाखल होताच पोलिसांचं एक पथक तातडीनं दिल्लीला पोहोचलं. आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी घालण्यात आल्या. पण दोघेही सापडले नाहीत. त्यानंतर त्यांच्या घरांवर कायदेशीर नोटिसा चिकटवण्यात आल्या.

Goa Nightclub Fire: इंडिगोच्या विमानानं दोघांनी थेट थायलंड गाठलं

Continues below advertisement

दरम्यान, 7 डिसेंबरच्या संध्याकाळी दोघांविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं. मुंबई इमिग्रेशनशीही संपर्क साधण्यात आला. दोन्ही आरोपी 7 डिसेंबर रोजी पहाटे साडे पाच वाजता इंडिगोच्या फ्लाईट 6E 1073 नं फुकेटसाठी रवाना झाले होते. लुथरा यांच्या क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. त्यानंतर पुढील काही तासांत सौरभ आणि गौरव लुथरा यांनी देश सोडला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Goa Pub Fire : दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठक घेत नुकसानग्रस्त कुटुंबांसाठी मदत जाहीर केली. त्यामध्ये मृतांच्या नातेवाइकांना 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

'बर्च बाय रोमिओ लेन क्लब' या क्लबमध्ये आग लागली तेव्हाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. आग लागली तेव्हा डान्स फ्लोअरवर एक नृत्यांगना सादरीकरण करत होती. त्याचवेळी लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या वरती असलेल्या छताला आग लागली. नाईक क्लबचा भटारखाना वरच्या मजल्यावर आहे. तर त्याच्या बरोबर खाली डान्स फ्लोअर आहे. वरती भटारखान्यात आग लागल्यावर डान्स फ्लोअरचं छत अक्षरशः कापरासारखं पेटलं.

ही बातमी वाचा: