Goa Night Club Fire: गोव्यातील म्हापसा जवळील हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन क्लब' या क्लबमध्ये काल (6 नोव्हेंबर) मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत (Goa Night Club Fire) आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अग्रिशमन दल आणि पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढून त्यांना जीएमसीमध्ये पाठविले आहेत. सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

क्लब बर्च बाय रोमियो लेनमध्ये लागलेल्या या मोठ्या आगीत 25 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 पर्यटक तर 14 जण क्लबचे कर्मचारी आणि उर्वरित 7 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून, दोघांचा मृत्यू आगीत होरपळून तर उर्वरितांचा धुरामुळे गुदमरून झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मृतांमध्ये क्लबचा स्टाफ तसेच काही पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. (Goa Nightclub Fire)

धुराचे दाट लोट आणि बाहेर पडण्यासाठीची धडपड- (Goa Night Club Fire)

आगीने काही क्षणांतच संपूर्ण क्लबला विळखा घातला. लाकडी संरचना, सजावट आणि ज्वलनशील साहित्य यामुळे ज्वाळांचा वेग वाढला. धुराचे दाट लोट आणि बाहेर पडण्यासाठीची धडपड यामुळे घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. म्हापसा, पणजी आणि कळंगुट अग्रिशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले होते. स्थानिक नागरिकांनीही स्वयंसेवक म्हणून मदत केली. अनेक मृतदेह ओळखण्याजोगे नसल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड आहे. सध्या पोलिसांनी मुख्य गेट बंद केलं असून क्लब च्या बाहेर मोठी गर्दी झाली आहे.

फ्लोअरचं छत अक्षरशः कापरासारखं पेटलं- (Goa Night Club Fire Video)

'बर्च बाय रोमिओ लेन क्लब' या क्लबमध्ये आग लागली तेव्हाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. आग लागली तेव्हा डान्स फ्लोअरवर एक नृत्यांगना सादरीकरण करत होती. त्याचवेळी लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या वरती असलेल्या छताला आग लागली. नाईक क्लबचा भटारखाना वरच्या मजल्यावर आहे. तर त्याच्या बरोबर खाली डान्स फ्लोअर आहे. वरती भटारखान्यात आग लागल्यावर डान्स फ्लोअरचं छत अक्षरशः कापरासारखं पेटलं.

गोव्यातील नाईट क्लबमध्ये भीषण आग, VIDEO:

संबंधित बातमी:

Goa Night Club Fire: स्फोट, बेसमेंट अन् मृतदेह; गोव्यातील नाईट क्लबमध्ये 23 जणांचे जीव वाचू शकले असते; पण... आगीपूर्वी धुरामुळे झाला मृत्यू, नेमकं काय घडलं?

Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?