Kanika Kapoor Grabbed By Fan: बॉलिवूडची (Bollywood News) सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) हिच्या लाईव्ह कॉन्सर्ट (Live Concert) दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका चाहत्यानं केलेल्या कृत्यानं चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गायिकेसोबत घडलेल्या या कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरनं 7 डिसेंबर रोजी मेघालयातील (Meghalaya) मेगाँग फेस्टिव्हलमध्ये (Me'Gong Festival) लाईव्ह परफॉर्म केलं. पण, गायिकेच्या कॉन्सर्ट दरम्यान तिच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं पाहायला मिळालं. कॉन्सर्ट दरम्यान एका चाहत्यानं स्टेजवर चढून अत्यंत आक्षेपार्ह्यरित्या तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पण, कनिकानं परिस्थिती अत्यंत धाडसीपणानं हाताळली. कनिकानं त्या चाहत्याला मागे लोटलं, तेवढ्यात तिच्यासोबत कॉन्सर्ट टीममध्ये असलेले काहीजण तिथे आले आणि त्यांनी त्या चाहत्याला कनिकापासून दूर लोटलं. या सगळ्यात कनिकानं तिचं गाण मात्र थांबू दिलं नाही. पण, कनिकासोबत घडलेल्या प्रकारावर चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
चाहत्याचं गायिकेसोबत आक्षेपार्ह्य कृत्य
व्हायरल व्हिडीओमध्ये गायिका कनिका कपूर तिचं गाजलेलं 'काला चष्मा' गाणं गाताना दिसतेय. अचानक प्रेक्षकांमधील एका चाहत्यानं स्टेजवर उडी मारली आणि तिला आक्षेपार्ह्यपणे मिठी मारण्याचा प्रयत्न केला. तिचे पायही धरले. कनिकानं लगेच त्या चाहत्याला दूर ढकलून दिलं. या सगळ्यात कनिकानं परफॉर्म करणं अजिबात थांबवलं नाही आणि गाणं सुरूच ठेवलं. त्यानंतर कनिकाच्या सह-कलाकारांनी आणि बाउन्सर्सनी चाहत्याला स्टेजवरून बाहेर काढलं.
"हजारोंच्या गर्दीतही एक बाई सुरक्षित नाही..."
कनिका कपूरवरील या लज्जास्पद कृत्यावर नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "जर हजारो लोकांच्या गर्दीत एक महिला सुरक्षित नसेल, तर एकट्यानं चालणाऱ्यांसाठी काय अपेक्षा ठेवायची? तुमच्या मुलांना एक महिलेचा आदर करायला शिकवा, हाच खरा उपाय आहे..." दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "भारतातील महिला इतक्या लोकांसमोर स्टेजवरही सुरक्षित नाहीत..."
आणखी एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय की, "तो काय करण्याचा प्रयत्न करत होता? तो तिला उचलण्याचा, तिचा विनयभंग करण्याचा किंवा मिठी मारण्याचा प्रयत्न करत होता का? हा आदर नाही, अशा लोकांना तुरुंगात पाठवायला हवं..."
कनिका कपूरची हिट गाणी
कनिका कपूरनं बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. तिने 'चिट्टिया कलैयां', 'लव्ह लेटर' आणि 'बेबी डॉल' सारख्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. ही गायिका सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे, तिचे इंस्टाग्रामवर 13.9 लाख फॉलोअर्स आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :