गडचिरोली : शेतात धानाच्या गंजीवर ताडपत्री झाकण्यासाठी गेलेला 10 वी च्या वर्गातील विद्यार्थ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. तर दुसरा जखमी झाला आहे. कोरची तालुक्यातील केसालडाबरी येथे ही घटना घडली आहे. सरगम सोमनाथ कोरचा (17) असे मृत, तर योगेश घावळे (17) असे जखमी मुलाचे नाव आहे.
सरगम कोरचा हा मसेली येथील छत्रपती विद्यालयात शिकत होता. सध्या सर्वत्र धान कापणीचा हंगाम सुरु आहे. केसालडाबरी येथील सोमनाथ कोरचा यांच्याही शेतात धान कापणी सुरु होती. परंतु, आज दुपारी अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने सोमनाथ कोरचा यांचा मुलगा सरगम हा त्याचा गोंदिया जिल्ह्यातील गुजूरबडगा येथील नातेवाईक योगेश घावळे याच्यासह धानाच्या गंजीवर ताडपत्री झाकण्यासाठी गेल होता. परंतू, पाऊस सुरु असल्याने दोघेही शेतातील मोहाच्या झाडाखाली थांबले होते. सरगमचे वडील सोमनाथ कोरचा हे थोड्या अंतरावर थांबले होते. काही वेळातच झाडावर वीज कोसळल्याने सरगम व योगेश खाली पडले. सोमनाथ कोरचा यांनी गावकऱ्यांना बोलावून दोघांनाही कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतू डॉक्टरांनी सरगमला मृत घोषित केले.
महत्वाच्या बातम्या: