Gadchiroli Latest Marathi News Update: गडचिरोली येथील कोरची तालुक्यामध्ये रानटी हत्तीचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यामुळे अजूनही येथील नागरिक व शेतकरी चिंतेत आहेत. कोरची मुख्यालयापासून अतिसंवेदनशील क्षेत्र असलेल्या कोटगुल क्षेत्रातील तलारगड गावातील एका वृद्ध शेतकऱ्यांचे रानटी हत्तीने पायात दाबून जागीच जीव घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यापूर्वी लेकुरबोडी येथील 80 वर्षीय वृद्ध महिलेला सोंडेत उचलून तिचा जीव घेतला होता. आज घडलेली ही तालुक्यातील दुसरी घटना असून काही दिवसापूर्वीच बेळगाव घाटावर दुचाकीने प्रवास करत असलेल्या कोरचीत एका व्यापारीला हत्तीने जखमी केले होते.
सध्या रानटी हत्तीचा वास्तव्य टिपागड पर्यटन देवस्थान असलेल्या जंगल परिसरामध्ये आहे. टीपागड डोंगराखाली घनदाट जंगल परिसरात असलेल्या तलवारगढ गावातील धनसिंग टेकाम (71) यांचे घरात शिरून शुक्रवारी रात्री आठ वाजता दरम्यान 15 ते 20 रानटी हत्तींनी हल्ला केला. यावेळी एका हत्तीने पायात दाबून शेतकऱ्याचा जागीच जीव घेतला आहे. इतकेच नाही तर गावातील सर्व घराचे व शेतीचे नुकसान केले आहे. न्याहायकल येथील चम्मीबाई धनसिंग पुडो, सुखदेव कल्लूराम कुरचाम, चैतु सुखदेव कुरचाम या तीन शेतकऱ्यांचे शेतीची खूप नासधुस करत नुकसान केले आहे. तलवारगढ या गावात आठ घरांची वस्ती आहे. सदर घटनास्थळी मालेवाडा वनपरिक्षेत्राचे वन कर्मचारी आले असून नुकसानीचे पंचनामे करीत असल्याचे सांगितले जात आहे.
सदर रानटी हत्तींना खाद्यासाठी सर्वाधिक केळीचे झाड, मोह फुल पसंत आहे. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या मोह फुलाच्या सुगंधाने हे रानटी हत्ती गावात येतात. त्यानंतर केळीचे झाड मोहाचे फुल, धान खाण्यासाठी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी रानटी हत्तींनी हल्ला करत शेतीचे नुकसान केले, अशा ठिकाणी केळीचे आणि मोहा फुलांचं साठा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मागील आठ दिवसापासून सदर हत्ती हे गोटगुल क्षेत्रातील टिपागढ, तलवारगढ, न्याहायकल जंगल परिसरात असल्याची माहिती असून गडचिरोली वन विभागाच्या मुरुमगाव वन परिक्षेत्र वन विभागाचे अधिकारी पिकप गाडी वर डेड बॉडी घेवून कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात पीएम करीता घेऊन आले. कोरची पोलीस स्टेशन मध्ये याची नोंद दाखल करण्यात आली आहे. तुर्तास सर्व रानटी हत्ती गोंदिया जिल्ह्यात परत गेले आहेत.
आणखी वाचा :
Nashik Crime : नाशिकमधून तीन दिवसांत 13 लाखांच्या दुचाकी सापडल्या, दुचाकी चोरही ताब्यात