नागपूर :  दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने 31 व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगित महोत्सवाचे आयोजन 28 ते 30 जुलै दरम्यान करण्यात आले आहे. देशभरातील नामांकित कलावंत या समारोहादरम्यान सादरीकरण प्रस्तूत करतील, अशी माहिती केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर यांनी दिली.


मागील 31 वर्षांपासून संगीत समारोहाची परंपरा केंद्राकडून जोपासली जात असल्याचे सांगून खिरवडकर म्हणाले, डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात 28 जुलैला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. उद्घाटन दिनी प्रथम प्रस्तूती सुविख्यात शहनाई वादक पद्मश्री पंडित डॉ. एस. बल्लेश भजंत्री व समूहाच्या सादरीकरणाने होईल. त्यानंतर विदुषी डॉ. अश्विनी भिड़े- देशपांडे शास्त्रीय गायन सादर करतील. 29 जुलैला ख्यातनाम नृत्यांगणा शमा भाटे 'राम लला' या कथक बैले नाटिकेचे सादरीकरण, यानंतर प्रसाद खापर्डे यांचे 'शास्त्रीय गायन' होईल. तिसरी प्रस्तुती पद्मश्री पंडित डॉ. येल्ला वेंकटेश्वर राव व समूहाद्वारे 'तालवाद्य कचेरी' च्या रुपात सादर केली जाईल.


Stamp Duty Penalty : दंड आणि शास्तीवर 90 टक्के सवलत मिळविण्यासाठी शेवटचे सहा दिवस, 31 जुलैला संपतोय मुद्रांक शुल्काच्या दंडाबाबत सवलत योजनेचा पहिला टप्पा


समारोपीय कार्यक्रमात 'धाडीला राम तिने का वनी?'चे सादरीकरण


31 व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगित महोत्सवाचा 30 जुलै रोजी समारोप होणार आहे. समारोपीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहतील. यावेळी द.ग. गोडसे लिखित संगीत नाटक 'धाडीला राम तिने का वनी?' या नाटकाचे मंचन केले जाणार आहे. 31 व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृति संगीत महोत्सवाच्या तीन दिवस दिवसासाठी प्रवेशिक उपलब्ध असून त्यासाठी अनुदान राशी 300 रुपये ठेवण्यात आली आहे. या समारोहाला उपस्थित राहण्याचे आवाहन खिरवडकर यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला दीपक कुलकर्णी, गोपाल बेतावार, गणेश थोरात, शशांक दंडे, श्रीकांत देसाई उपस्थित होते. 


Ganeshotsav 2022 : निर्बंध नाही, पण पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घ्या, मनपा आयुक्तांचे आवाहन