Nagpur : बिटकॉईन, गोल्ड शेअर आदींमध्ये गुंतवणूक करा आणि बक्कळ नफा मिळवा, अशा 'पेड' जाहीराती सोशल मीडियावर झळकत असतात. यावर विश्वास ठेवून मोबाइलमध्ये अॅप्लिकेशन इन्स्टॉल करुन पैसे गुंतवणे कम्प्युटर व्यवसायिकाला महागात पडले. गोल्ड शेअर ट्रेडिंग वेबसाइटद्वारे त्यांनी सुमारे साडेसहा लाख रुपये गुंतवले आणि साडेसहा लाखाचे 16 लाख 17 हजार रुपये झाल्याचे त्यांना दिसत होते. मात्र पैसे काढायला गेले तेव्हा फसवणूक झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
विश्वास संपादन करण्यासाठी दिला नफा
नितेश लक्ष्मण राऊत (वय 40, रा. धनश्री अपार्टमेंट, तुकडोजी चौक) यांचे छोटी धंतोली परिसरात सत्यसाई कम्प्युटर नावाने दुकान आहे. 24 मे रोजी त्यांच्या मोबाईलवर 9915903119 या क्रमांकावरुन व्हॉट्सअॅप मॅसेज आला. त्यात गोल्ड शेअर ट्रडिंग वेबसाइटबाबत माहिती देण्यात आली. याशिवाय त्यात गुंतवणूक केल्यास अधिक फायदा मिळेल, अशीही बतावणी करण्यात आली. त्यानंतर नमस्ते फ्यूचर डॉटकॉम यावरून त्यांना संदेश आळा. त्यावरून नितेश यांनी आफली संपूर्ण माहीती भरली, त्यानंतर 100 रुपये भरुन त्यांनी खाते उघडले. त्यात फायदा मिळाल्याने त्यांनी काही रक्कम काढून घेतली. त्यामुळे त्यांना विश्वास बसला. दरम्यान राऊत यांनी दोन महिन्यात वेगवेगळ्या दिवशी जवळपास 6 लाख 83 हजार 300 रुपये गुंतविले.
आधी एरर आणि नंतर वेबसाइटही बंद
10 जून रोजी त्यांनी आपले खाते बघितले असता त्यात 16 लाख 17 हजार 600 रुपये आढळून आले. त्यांनी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात सातत्याने एरर येत असल्याचे दिसून येत असल्याचे दिसून आले. त्यांनी संबंधित व्यक्तीला विचारणा केली असता त्यानेही हा एरर 3 दिवस राहील, असे सांगितले. मात्र, तीन दिवसानंतर वेबसाईट आणि लिंक बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे राऊत यांनी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
वाचा