नवी मुंबई : आयपीएल मॅचवर सट्टा खेळणाऱ्या चौघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या चौघांकडून पोलिसांनी एकूण एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोलकाता विरुद्ध सनराईज हैद्राबाद सामन्यावर सट्टा लावला जात होता. त्यावेळी सट्टा लावणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. इम्रान धानानी, जयेश कारिया, आशीर्वाद म्हस्के आणि संदीप यादव अशी चौघांची नावं आहेत. मात्र, आयपीएल सामन्यांच्या सट्ट्याचा अड्डा चालवणारा अद्याप फरार आहे.
या कारवाईत पोलिसांनी 1 लॅपटॉप, टिव्ही, 18 मोबाईल असा एकूण 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर सट्ट्याचा अड्डा लावणाऱ्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, सट्टेबाजांचे हे नेटवर्क मुंबईसह गुजरातपर्यंत पसरल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.