नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर सोमवारी (दि.27) दाट धुक्याची चादर पसरली होती. दाट धुक्यामुळे दिल्लीतील विमानसेवा ठप्प झाली होती. आयजीआय (IGI Airport) विमानतळावर याचा मोठा परिणाम झाला. दाट धुक्यामुळे (Dense Fog Engulfs) दृष्यमानता फारच कमी झाली होती. स्पष्टपणे काहीही दिसत नव्हते. त्यामुळे तब्बल 110 विमान उड्डाणांना विलंब झाला आहे. वैमानिकांना पुढील दृष्य स्पष्टपणे दिसावे, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. मात्र, या प्रयत्नांचा वैमानिकांना याचा मोठा फायदा झालेला नाही. दृष्यमानता कमी झाल्यामुळे जवळपास 18 विमानांच्या उड्डाणांना जास्त कालावधी लागला आहे. शिवाय, वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या आठ फ्लाईट्स इतर ठिकाणी वळवण्यात आल्या आहेत. यामध्ये सात फ्लाईट्स जयपूरकडे तर एक अहमदाबादकडे वळवण्यात आल्या आहेत. 


विमानसेवेचे वेळापत्रक कोलमडले 


दाट धुक्यामुळे विमानसेवेच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल करावा लागला आहे. विमान उड्डाणांमध्ये अजूनही विलंब होत आहे. सध्या जवळपास 125 विमानांमधील प्रवाशांना प्रवास करण्यास विलंब झाला आहे. यामध्ये 15 विदेशात जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे. तर इतर भारतामध्येच प्रवास करणार आहेत.  आज (दि.२७) सकाळी दृष्यमानता कमी झाल्यामुळे पटना, अहमदाबाद, पुणे, जयपूर आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये जाणाऱ्या विमान उड्डाणांना तासंतास विलंब होत आहे. पटनाला जाणारे विमान 5 तास उशीरा पोहचले आहे. शिवाय, अहमदाबादहून उड्डाण करणारे विमानाला 8 तासांचा विलंब झाला आहे. सकाळी 10.00 वाजेपर्यंत विमानतळावरिल दृष्यमानता 175 मीटर होती. जेव्हा धुके कमी होण्यास सुरुवात झाली तेव्हाही, दृष्यमानता 500 मीटर होती.  


तिन्ही रनवे वरती दृष्यमानता वाढवण्यासाठी प्रयत्न 


दृष्यमानता कमी झाल्यानंतर विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी आयजीआयच्या तिन्ही रनवे वरती दृष्यता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या प्रक्रियेमध्ये कमी दृश्यता असतानाही विमानांच्या उड्डाणांसाठी प्रयत्न करण्यात आला. यासाठी विेशेष उपाययोजना राबविण्यात आली होती.  दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर दाट धुके पडल्यानंतर उपाययोजना राबविण्यासाठी सर्व साधने उपलब्ध आहेत. एखाद्या विमानतळावर दाट धुक्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास याला 'कॅटगिरी 3' म्हणून ओळखले जाते. शिवाय कॅटगिरी 1 आणि 3 देखील आहे. मात्र, 'कॅटगिरी 3'मध्ये दृष्यमानता फारच कमी असते. अशा परिस्थिती वैमानिकांना विशेष प्रशिक्षणाची गरज असते. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


दिल्लीनंतर आता मुंबईतूनही अयोध्येला जाण्यासाठी फ्लाईट सुरु होणार, 'इंडिगो'ची मोठी घोषणा