मुंबई : विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ एका इमारतीला भीषण आग लागली होती. विलेपार्ले पश्चिम भागात बजाज रोड जवळ असणारी  ' लाभ श्री व्हिला ' नावाच्या बिल्डिंगला लागलेली आग आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे.  ही 12 मजली इमारत असून बिल्डिंगच्या 8व्या आणि 9व्या मजल्यावर ही आग लागली होती. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  ही आग संध्याकाळी सातच्या सुमारास लागली होती.
डीसीपी परमजीत दहिया यांच्या म्हणण्यानुसार बिल्डिंगच्या आठव्या मजल्याला आग लागली आहे. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. सर्वांना सुरक्षित बिल्डिंगमधून बाहेर काढण्यात आलं आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बिल्डिंगमध्ये चार जण अडकले होते. त्यांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आले आहे. आठव्या मजल्यावर इंटीरियरचं काम सुरू होतं. याठिकाणी केमिकलचा वापर करण्यात आला होता. हे केमिकल पडल्यामुळेच आठव्या मजल्याला आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की अगदी काही क्षणात आग नवव्या मजल्यावर लागली.

इमारतीत काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. 13 मजल्याच्या या इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर ही आग लागली होती. आठव्या मजल्यावर रिपेरींगचं काम सुरु असताना शॉर्टसर्किटने आग लागल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली होती.

मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानक परिसरातील आझाद रोडवर असलेल्या लाभ श्री इमारतीला रविवारी सायंकाळी भीषण आग लागली होती.

या रहिवासी इमारतीमध्ये काही कार्यालयं देखील असल्याची माहिती आहे. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच या इमारतीसह आजूबाजूच्या इमारतींमधील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. आग लागल्याचे समोर येताच आजूबाजूच्या इमारतींमधील लोक देखील बाहेर पडले होते. त्यांना इमारतीबाहेर पडण्याचे निर्देश दिले गेले होते. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे साम्राज्य आहे.