मुंबई : कर्जमाफीबाबत अभ्यास करण्याचा प्रश्न नाही, त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केला आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबरच्या अगोदर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.


शेतीकडे गेल्या अनेक वर्षांपासून उदासीन नजरेतून पाहिल. त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात आज शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. हा संप सरकारविरोधात नाही. त्यामुळे सरकार शेतकरी संपाकडे सकारात्मक नजरेतून पाहत आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचंच आहे. मात्र त्याआधी छोट्या-छोट्या सुविधा पुरवण्यावर सरकार भर देत आहे. उत्पादन वाढलं आहे. पण उत्पन्न वाढीसाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी शेतीपूरक योजनांना प्रोत्साहन दिलं जात आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

''मुख्यमंत्री एकटे नाहीत''

शेतकरी संपाच्या दरम्यान मुख्यमंत्री एकटे पडले आहेत. त्यांना कोणत्याही मंत्र्याची साथ नाही, असा आरोप केला जात आहे. त्यावरही मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं.

कोणत्याही प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन जाता येत नाही. मुख्यमंत्री जेव्हा निर्णय घेतात तेव्हा ते सर्व मंत्र्यांशी चर्चा करतात. सर्व मंत्री त्यांच्या पाठिशी आहेत, असं मुनगंटीवार म्हणाले.

पाहा व्हिडिओ :



संबंधित बातम्या :

टेक्नॉलॉजीद्वारे कर्जमाफी करणार : मुख्यमंत्री


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपाचा फायदा परराज्यातील शेतकऱ्यांना!


राज्यभरात शेतकऱ्यांचं टाळेठोक आंदोलन