केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचं भाषण सुरू असतानाच, एका पत्रकाराने बुलेट ट्रेनला हिंदीमध्ये काय म्हणतात? असा हा प्रश्न विचारला. या प्रश्नामुळे भडकलेल्या जेटलींनी प्रश्न विचारणाऱ्याला लगेच फैलावर घेतलं. आणि जरा गंभीर होण्याचा सल्ला दिला.
तसेच त्यांनी माध्यमांवर आगपाखड करताना, कमी माहिती असलेले लोक बुलेट ट्रेनच्या विषयावर नाहक वाद उकरुन काढत असल्याचे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते नुकतंच अहमदाबादमध्ये देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचे भूमीपूजन झालं. त्यानंतर देशात बुलेट ट्रेनवरून सोशल मीडिया व माध्यमांमध्ये मोठ्या चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले अरुण जेटली?