Shekhar Kapur : मिस्टर इंडिया या चित्रपटाचा रिमेक येणार अथवा पुढील भाग येणार... अशी चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगली होती. यावर आता चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मिस्टर इंडिया हा चित्रपट पुन्हा बनवणार नसल्याचे स्पष्ट सांगितलेय. indianexpress.com ला दिलेल्या मुलाखतीवेळी मिस्टर इंडियाच्या आठवणीने शेखर कपूर भावूक आणि उदासीन झाले होते. ते म्हणाले की, मिस्टर इंडिया चित्रपट पुन्हा बनवणार नाही. कारण,  चित्रपटाचे नाव निघाल्यानंतर हवा हवाईची भूमिका करणारी श्रीदेवी, मोगॅम्बोची भूमिका साकारणारे अमरीश पुरी आणि कॅलेंडरची व्यक्तीरेखा साकारने सतिश कौशिक यांच्या आठवणीत मी भावूक होतो. हा चित्रपट पुन्हा करायचे झाल्यास मला रडू कोसळेल. तसेच हा चित्रपट आता अयशस्वी होईल, असे वाटतेय. यावेळी सतिश कौशिक यांच्या निधनाबद्दल शेखर कपूर यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, "मिस्टर इंडिया'चा रिमेक करण्याची इच्छा नाही. कारण या चित्रपटातील प्रत्येक पात्राची निरागसता आणि भोळेपणा या चित्रपटात आहे. या चित्रपटाची पुन्हा निर्मिती केल्यास चुकीचे आहे.


मिस्टर इंडिया 2 करण्यास कितपत तयार आहात ? असे विचारले असताना शेखर कपूर म्हणाले की, मिस्टर इंडिया 2 बनवणार नाही. कारण, तो अयशस्वी होईल अशी भीती आहे.  मी तो चित्रपट दिग्दर्शित केला तर मोठी अडचण होईल. मासूम, मिस्टर इंडिया, बॅन्डिट क्वीन, एलिझाबेथ, द फोर फेदर्स, याच्याशी प्रेमाचा काय संबंध? हे सर्व पूर्णपणे भिन्न शैलीचे आहेत. अशा स्वतःच्या चित्रपटाची पुनरावृत्ती केली तर अयशस्वी होईल. 






मिस्टर इंडिया बनवताना काल्पनिक 11 वर्षांच्या मुलाची मदत झाल्याचे शेखर कपूर यांनी सांगितेल. ज्याने शेखर कपूरला सतत अभिप्राय दिला आणि त्यामुळे चित्रपटात खेळकरपणाची भावना निर्माण झाली  होती. शेखर कपूर म्हणाले की, मिस्टर इंडिया चित्रपट तयार करताना स्वत 11 वर्षाचा लहान मुलगा होत होतो अन् तसे सेटवर बोलतही होतो. चित्रपट तयार करताना एन्जॉय केला...चित्रपटात मासूम आणि खेळकरपणा दाखवण्यात आला होता. आताही या चित्रपटाबद्दल फोन अथवा मेसेज येतात. हा चित्रपट लहान मुलांना समोर धरुन तयार केला तरीही याचा मोठ्या लोकांवरही परिणाम झाला.  


मिस्टर इंडिया हा सुपरहिरो चित्रपट नव्हता. त्यात युनिक पात्रे आहेत. मार्व्हल आता जे करण्याचा प्रयत्न करत आहे, ते आम्ही तेव्हा केले होते. सतिश कौशिक यांनी साकरलेल्या कॅलेंडर या भूमिकेच्या नावावरुन बेंगलोरमध्ये याचं नावाचे रेस्टॉरंट सुरु आहे. मोगॅम्बोही तितकेच गाजलेले पात्र आहे. त्याशिवाय मिस हवा हवाईनेही प्रेक्षकांची मने जिंकली. दागा, तेजा ही पात्रेही लोकांना आवडली.  अरुण पात्रही तितकेच वेगळे होते. जावेद अख्तर यांच्या स्क्रीनप्लेने या पात्रांना वेगळी ओळख करुन दिली.