Filmfare OTT Awards 2024 Winners LIST : फिल्मफेअर OTT अवॉर्ड (Filmfare OTT Award) 2024 ची यादी रविवार, 1 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यात अनेक चित्रपट आणि वेब सिरीजच्या नावांचा समावेश आहे. अनेक अभिनेत्यांचाही फिल्मफेयर पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे. ज्यामध्ये फैसल खानपासून निधी बिष्टपर्यंत सर्वांना फिल्मफेयर पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. एवढंच नाही तर रवी किशनच्या 'मामला लीगल है' या वेब सीरिजनंही अनेक टायटल जिंकले आहेत.
प्राईम व्हिडीओवरची आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय सीरिज 'पंचायत'च्या तिसऱ्या सीझनमध्ये, फैसल मलिकनं सचिव आणि प्रधान जी यांना मागे टाकून सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे. त्याचबरोबर 'द रेल्वे मॅन'नं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तीन फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. मात्र, संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी: द डायमंड बझार'नेही दमदार कामगिरी केली आणि 4 पुरस्कार पटकावले. या यादीत एआर रहमानच्या नावाचाही समावेश आहे.
पाहा फिल्मफेयर ओटीटी अवॉर्ड्स 2024 ची विनर्सची संपूर्ण यादी
- बेस्ट सपोर्टिंग एक्टर, सीरीज, कॉमेडी, मेल : फैसल मलिक (पंचायत 3)
- बेस्ट सपोर्टिंग एक्टर, कॉमेडी, ड्रामा, फीमेल : निधि बिष्ट (मामला लीगल है)
- बेस्ट ओरिजिनल स्टोरी, सीरीज : बिस्वपति सरकार (काला पानी)
- बेस्ट कॉमेडी सीरीज : मामला लीगल है
- बेस्ट नॉन फिक्शन ओरिजनल सीरीज : द हंट फॉर वीरप्पन
- बेस्ट डायलॉग- सीरीज : सुमित अरोरा (गंस एंड गुलाब्स)
- बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : सीरीज- राज राज निदिमोरु, कृष्णा डीके आणि सुमन कुमार (गंस एंड गुलाब्स)
- बेस्ट अडैप्टेड स्कीनप्ले- सीरीज : किरण यज्ञोपवित, केदार पाटणकर आणि करण व्यास (स्कॅम 2003- द तेलगी स्टोरी)
- बेस्ट सिनेमैटोग्राफर- सीरीज : सुदीप चटर्जी (ISC), महेश लिमये (ISC), ह्यूनस्टांग मोहपात्रा आणि रागुल हेरियन धारुमन (हीरामंडी: द डायमंड बाजार)
- बेस्ट प्रोडक्शन डिजाइन- सीरीज : सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रॉय (हीरामंडी: द डायमंड बाजार)
- बेस्ट एडिटिंग- सीरीज : यश जयदेव रामचंदानी (द रेलवे मैन)
- बेस्ट कॉस्ट्यूम डिजाइन- सीरीज : रिम्पल, हरप्रीत नरूला आणि चंद्रकांत सोनावणे (हीरामंडी: द डायमंड बाजार)
- बेस्ट बैकग्राउंड म्यूजिक- सीरीज : सॅम स्लेटर (द रेलवे मैन)
- बेस्ट ओरिजनल साउंडट्रैक- सीरीज : संजय लीला भंसाली, राजा हसन आणि शर्मिष्ठा चटर्जी (हीरामंडी: द डायमंड बाजार)
- बेस्ट VFX- सीरीज : फिल्मगेट एबी आणि हाइव स्टूडियोज (द रेलवे मेन)
- बेस्ट साउंड डिजाइन- सीरीज : संजय मौर्या आणि ऑलविन रेगो (काला पानी)
- बेस्ट डायलॉग- वेब ओरिजनल फिल्म : इम्तियाज अली आणि साजिद अली (अमर सिंह चमकीला)
- बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले- वेब ओरिजनल फिल्म : इम्तियाज अली आणि साजिद अली (अमर सिंह चमकीला)
- बेस्ट सिनेमैटोग्राफर- वेब ओरिजनल फिल्म : सिल्वेस्टर फोंसेका (अमर सिंह चमकीला)
- बेस्ट प्रोडक्शन डिजाइन- वेब ओरिजनल फिल्म : सुजैन कैपलान मेरवानजी (द आर्चीज)
- बेस्ट एडिटिंग- वेब ओरिजनल फिल्म : आरती बजाज (अमर सिंह चमकीला)
- बेस्ट बैकग्राउंड म्यूजिक- वेब ओरिजनल फिल्म : एआर रहमान (अमर सिंह चमकीला)
- बेस्ट म्यूजिक डिजाइन- वेब ओरिजनल फिल्म : धीमान कर्मकार (अमर सिंह चमकीला)
- बेस्ट स्टोरी- वेब ओरिजनल फिल्म : जोया अख्तर, अर्जुन वरेन सिंह आणि रीमा कागती (खो गए हम कहां)
महत्त्वाच्या इतर बातम्या :