MUmbai Crime: मुंबईत महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना एक भयंकर घटना घडली आहे. मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरून ब्लॅकमेल करत ५६ वर्षीय नराधमानं १४ वर्षांच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याच्या घटनेनं मुंबई हादरली आहे. अत्याचार करणाऱ्या अंधेरी येथील डीएन पोलिसांनी अटक केली असून या नराधमाला मदत करणाऱ्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.याप्रकारणी पोक्सो कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीस घाबरवून अत्याचार
मित्रांसोबतच्या संवादाचे चित्रिकरण करून कुटुंबियांना दाखवण्याची धमकी देऊन ५६ वर्षीय व्यक्तीनं १४ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना मुंबईत घडली. या घटनेत अत्याचार करणाऱ्या ५६ वर्षांच्या आरोपीला व त्याच्या साथीदाराला अंधेरी येथील डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दोघांवरही पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचार करणाऱ्या आरोपीने पीडित मुलीला मैत्री करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याच्यासोबत बोलतानाचा व्हिडिओ करत कुटुंबियांना दाखवेन अशी धमकी देत पीडित मुलीस आरोपीने घाबरवले.ते चित्रीकरण पीडित मुलीला दाखवून तिच्या पालकांना याबाबत सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे.
शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य
लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु) येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्यध्यापकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. अनेक अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला असून गेल्या साडे तीन वर्षांपासून सुरु असणारे प्रकरण आता समोर आले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून संबंधित प्रभारी मुख्यध्यापकाचे निलंबनही करण्यात आले आहे. अण्णा श्रीरंग नरसिंगे हा हरंगुळ येथील जिल्हा परिषद शाळेत प्रभारी मुख्यध्यापक म्हणून सेवा बजावत होता. मात्र मागील साडे तीन वर्षात अनेक अल्पवयीन मुलींशी असभ्य वागणे, कोणतेही कारण पुढे करुन मुलींशी संवाद साधणे, अश्लिल भाषा वापरणे, एवढेच नाहीतर अल्पवयीन मुलींना हातपाय आणि डोक्याची मालीश करण्यास सांगणे...असले संता पूजन करत होता. याबाबतीची चर्चा गावात वाढली. गावातील नागरिकांनी याबाबत तक्रार शिक्षण विभागाकडे केली. गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ याची दखल घेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शिक्षण विभागाने दोषी शिक्षकास तात्काळ निलंबित केले आहे.